इंदोरीकर महाराजांना समर्थन, बाभळीच्या काट्यावर झोपून भगवान महाराजांची साधना

| Updated on: Feb 18, 2020 | 5:49 PM

निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत राज्यभरात कुठे विरोध तर कुठे समर्थन दिले जात (Bhagwan maharaj support indorikar maharaj) आहे.

इंदोरीकर महाराजांना समर्थन, बाभळीच्या काट्यावर झोपून भगवान महाराजांची साधना
Follow us on

बीड : निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत राज्यभरात कुठे विरोध तर कुठे समर्थन दिले जात (Bhagwan maharaj support indorikar maharaj) आहे. इंदोरीकर यांनी जे बोललं ते सत्य आहे. त्यांच्यावर टीका करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असे सांगत बीडच्या तांदळवाडी येथील महादेव मंदिरातील भगवान महाराज यांनी बाभळीच्या टोकदार काट्यावर निद्रा अवस्थेत साधना सुरु केली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात या महाराजांची चर्चा (Bhagwan maharaj support indorikar maharaj) सुरु आहे.

बीडपासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या तांदळवाडी गावात महादेव मंदिर आहे. याच मंदिरात बारा वर्षाच्या तपश्चर्यासाठी तपासासाठी भगवान महाराज आले आहेत. गतवर्षी भगवान महाराजांनी पाऊस पडू दे म्हणून झाडावर स्वतःला टांगून घेऊन साधना केली होती. आता मात्र भगवान महाराजांनी चक्क इंदुरीकर यांना त्रास झाला म्हणून स्वतःला त्रास करत बाभळीच्या टोकदार काट्यावर निद्रस्त होऊन साधना सुरू केली.

भगवान महाराज हे मूळचे लिंबारुई या गावातील आहेत. त्यांचा बारा वर्षाचा तप आहे. गेल्या दोन वर्षापासून तांदळवाडी येथील संगमेश्वर संस्थानात ते वास्तव्यास आहेत. इंदोरीकर यांच्या टिकेवरून राज्यात मोठी चर्चा सुरू आहे. त्यामुळेच अध्यात्म धोक्यात आल्याचं सांगत भगवान महाराज यांनी अशी कठोर साधना सुरु केल्याचं गावकरी सांगतात.

दरम्यान, “मी केलेल्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला”, असे इंदोरीकर यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितलं होतं. मात्र आज इंदोरीकर यांनी पुन्हा पत्र प्रसिद्ध करून दिलगिरी व्यक्त केली आहे.