भीमा कोरेगाव : क्रांती दिन जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीत होणार

| Updated on: Jul 09, 2021 | 3:14 PM

पुणे : क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगावला प्रशासनाने कडक उपाययोजना राबवल्या आहेत. क्रांती दिन जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणात पार पडणार आहे. परवानगीशिवाय फलक, स्टेज, स्टॉल्स लावण्यास मनाई करण्यात आलीय. गेल्या वर्षी क्रांती दिनानंतर दोन गटांमध्ये वाद होऊन हिंसाचार झाला होता. त्यानंतर यावर्षी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अनधिकृत फलक लावणाऱ्यांवर कडक कारवाईचा […]

भीमा कोरेगाव : क्रांती दिन जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीत होणार
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

पुणे : क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगावला प्रशासनाने कडक उपाययोजना राबवल्या आहेत. क्रांती दिन जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणात पार पडणार आहे. परवानगीशिवाय फलक, स्टेज, स्टॉल्स लावण्यास मनाई करण्यात आलीय. गेल्या वर्षी क्रांती दिनानंतर दोन गटांमध्ये वाद होऊन हिंसाचार झाला होता. त्यानंतर यावर्षी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
अनधिकृत फलक लावणाऱ्यांवर कडक कारवाईचा ईशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलाय. तर कार्यक्रमाचे आयोजक हे स्थानिक नागरिक आणि जिल्हा प्रशासन असेल. कार्यक्रमाच्या अगोदर जातीय तणाव निर्माण करणार्‍यांना सभांना परवानगी देणार नसल्याचं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केलंय.
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी परवानगीशिवाय फलक, स्टेज, स्टॉल्स लावण्यास मनाई करण्यात आलीय. समाजकंटकांवर पोलिसांची कडक नजर असेल. संभ्रम आणि अफवा पसरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. स्थानिकांना पूर्वीपासून आयोजनाची माहिती आहे. त्यांना गरज भासल्यास प्रशासन सहकार्य करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय.
क्रांती दिन प्रशासनाच्या देखरेखीखाली होणार असून स्थानिकांना आयोजनासाठी सर्व सहकार्य केलं जाणार आहे. कार्यक्रमाला मदत करु शकता, मात्र नकारात्मक मेसेज पसरवणाऱ्यांना रोखलं जाणार आहे. कुणावरही प्रतिबंध घातलेला नाही, पण प्रत्येकावर प्रशासनाची करडी नजर असेल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय.