कोरेगाव भीमा विजय दिनाची जय्यत तयारी, प्रत्येकावर सीसीटीव्हीची नजर

| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

पुणे : कोरेगाव भीमा इथे होण्याऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी यावेळी पाच लाख अनुयायी हजेरी लावण्याची अपेक्षा आहे. सर्वांना आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यासह कायदा सुव्यस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यंदा 10 पट अधिक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. स्तंभापासून 200 मीटरच्या बाहेर सभेला परवानगी देण्यात येईल. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये […]

कोरेगाव भीमा विजय दिनाची जय्यत तयारी, प्रत्येकावर सीसीटीव्हीची नजर
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

पुणे : कोरेगाव भीमा इथे होण्याऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी यावेळी पाच लाख अनुयायी हजेरी लावण्याची अपेक्षा आहे. सर्वांना आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यासह कायदा सुव्यस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यंदा 10 पट अधिक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

स्तंभापासून 200 मीटरच्या बाहेर सभेला परवानगी देण्यात येईल. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन सज्ज आहे. ज्या जागेचा वाद होता ती काही दिवसासाठी प्रशासनाच्या ताब्यात आली आहे. त्यामुळे कार्यक्रम अधिक शिस्तबद्ध पद्धतीने करता येईल, असं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचं म्हणणं आहे.

प्रक्षोभक भाषणांमुळे गेल्या वर्षी हिंसाचार उफाळल्याचं बोललं जातं. याही वर्षी अशी घटना घडू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. या परिसरात वढू गावचे गावकरी असो, किंवा या परिसरातील आसपासच्या गावातील गावकऱ्यांचा एकोपा आहे. असे असताना बाहेरून येणाऱ्या कोणीही याठिकाणी भडकावू भाषण करू नये यासाठी बाहेरून येणाऱ्या लोकांची चौकशी होणार आहे. तसेच या परिसरात सीसीटीव्ही देखील बसविण्यात आले आहेत.

1 जानेवारीला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या विजयस्तंभला अभिवादन करण्यासाठी येत असतो. हे लक्षात घेऊन मोठया प्रमाणात पोलीस प्रशासन तैनात करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे या परिसराच्या 100 ते 200 मीटरच्या आत कोणालाही भाषण करता येणार नाही, असे अनेक खबरदारीचे निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आले आहेत.

भीमा कोरेगावच्या कार्यक्रमातील ठळक मुद्दे

1 जानेवारी 2019, रणविजय स्तंभ अभिवादन कार्यक्रम, कोरेगाव भीमा

7 ते 8 लाख भाविक येतील असे गृहीत धरून तयारी

उपाययोजना :

पुणे – नगर रस्ता इतर वाहतुकीसाठी बंद असणार

अग्निशामक दलाच्या 23 गाड्या

22 रुग्णावाहिका उपलब्ध असणार

151 बसेस

11 ठिकाणी पार्किंग

35 ठिकाणी स्पीकर्स सिस्टिम्स

11 ड्रोन कॅमेरे

पार्किंगच्या ठिकाणी खान्याचे स्टॉल्स

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

250 मोबाईल स्वच्छता गृह

100 सीसीटीव्ही कॅमेरे

10 पट अधिक बंदोबस्त

5000 पोलीस / 12000 होमगार्ड /12 एसआरपीएफ / 400 स्वयंसेवक

आठ प्रथमोपचार केंद्र