Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी, राज्यातील धरणात पाणीसाठाही वाढला

| Updated on: Jul 23, 2020 | 8:22 AM

मुंबई आणि उपनगरात आज (23 जुलै) सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली (Mumbai Rain Update) आहे.

Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी, राज्यातील धरणात पाणीसाठाही वाढला
Follow us on

मुंबई : मुंबई आणि उपनगरात आज (23 जुलै) सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली (Mumbai Rain Update) आहे. दादर, लालबाग, परळ भागात सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. येथील सखल भागात पाणीही साचण्याची शक्यता वर्तवली (Mumbai Rain Update) आहे.

त्याशिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यत वर्तवण्यात आली आहे.

काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आज मुंबईत जोरदार हजेरी लावली आहे. या जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

नुकतेच काही दिवसांपूर्वी राज्यात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्याने समाधान व्यक्त केले आहे. तर राज्यातील धरणसाठ्यामध्ये पाणीसाठा वाढलेला आहे. सध्या राज्यातील मोठी धरणं 36 टक्के भरली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या धरणात सध्या 10 टक्के जास्त पाणीसाठा आहे. मध्यम धरणांमध्ये 32 टक्के आणि लघू धरणांमध्ये 14 टक्के पाणीसाठा आहे. राज्यातील सर्व धरणं मिळून सध्या 32 टक्के पाणीसाठा आहे.

कोकण विभागातील धरणं निम्मी भरली आहेत, तर नागपूर विभागातील धरणांमध्येही 44 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. म्हणजेच गेल्या काही दिवसांमध्ये धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे राज्यातील धरणं 32 टक्के भरली आहेत.

संबंधित बातम्या :

Rain Updates: राज्यभरात मुसळधार पाऊस, मोठ्या धरणांमध्ये 32 टक्के पाणीसाठा

Sindhudurg Rain | सिंधुदुर्गातील किनारपट्टी भागात जोरदार पाऊस