नितीशकुमार यांच्या निवासस्थानी भाजप-जेडीयूची बैठक, सत्ता स्थापनेबाबत खलबतं सुरु

| Updated on: Nov 10, 2020 | 8:46 PM

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी जेडीयू आणि भाजपची बैठक सुरु आहे (BJP and JDU leaders meeting at Nitish Kumar house).

नितीशकुमार यांच्या निवासस्थानी भाजप-जेडीयूची बैठक, सत्ता स्थापनेबाबत खलबतं सुरु
Follow us on

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निवासस्थानी जेडीयू आणि भाजपची बैठक सुरु आहे. या बैठकीत सत्ता स्थापन करण्याबाबतचे खलबतं सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्यासह भाजपचे मोठे स्थानिक नेते आणि जेडीयूचे नेते सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे (BJP and JDU leaders meeting at Nitish Kumar house).

दरम्यान, राष्ट्रीय जनता दलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत ट्विट करत भाजप आणि जेडीयूवर गंभीर आरोप केले आहेत. “नितीशकुमार आणि सुशीलकुमार मोदी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बसून जिल्हाधिकाऱ्यांना महागठबंधनला 105 ते 110 जागांवर रोखण्याचा आदेश देत आहेत. पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत जनमत लुटू देणार नाहीत”, असं राजदच्या ट्विटर अकाउंटवर म्हटलं आहे (BJP and JDU leaders meeting at Nitish Kumar house).

अमित शाहांचा नितीशकुमारांना फोन

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज रात्री उशिरापर्यंत समोर येईल. मात्र, भाजप्रणित एनडीए सध्या आघाडीवर आहे. भाजप सध्या सर्वाधिक 74 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपचा मित्रपक्ष जेडीयू 45 जागांवर आघाडीवर आहे. जेडीयूला यावेळी जास्त यश मिळताना दिसत नाही. मात्र, भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर असल्याने एनडीएचे बिहारमध्ये पुन्हा ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता आहे.

भाजप आघाडीवर असल्याने एनडीएची सत्ता स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री नितीशकुमारच राहाणार की त्यांना केंद्रात पाठवणार? अशा उलटसुलट चर्चांना उधान आलं आहे. या चर्चामुळे महाराष्ट्र आणि भाजप यांच्यात जशी ताटातूट झाली, तशीच ताटातूट जेडीयू आणि भाजपची होऊ नये, अशी भाजपच्या पक्षश्रेष्ठींची इच्छा असेल. दरम्यान, एनडीए आघाडीवर असल्याकारणाने भाजप नेते अमित शाह यांनी नितीशकुमार यांच्याशी आज संध्याकाळी फोनवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोघी नेत्यांनी सत्ता स्थापनेवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हेही वाचा : नितीशकुमारांचं नंबर वनचं स्वप्न भंगलं; चिराग पासवान ठरले ‘जाएंट किलर’!