सत्तेचा माज कोकणी जनता उतरवतेच, गितेश राऊतांच्या कथित व्हिडिओवरुन भाजप नेता आक्रमक

| Updated on: Jul 19, 2020 | 3:13 PM

सत्तेचा माज कोकणी जनता उतरवतेच, अशी टीका भाजप नेते आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी गितेश राऊतांच्या कथित व्हिडिओ प्रकरणावर केली (Pramod Jathar on Gitesh Raut) आहे.

सत्तेचा माज कोकणी जनता उतरवतेच, गितेश राऊतांच्या कथित व्हिडिओवरुन भाजप नेता आक्रमक
Follow us on

सिंधुदुर्ग : “सत्तेचा माज कोकणी जनता उतरवतेच”, अशी टीका भाजप नेते आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी गितेश राऊत यांच्या कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर केली (Pramod Jathar on Gitesh Raut) आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, तो शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा पुत्र गितेश राऊत असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणावर प्रमोद जठार यांनी टीका केली (Pramod Jathar on Gitesh Raut) आहे.

“सत्तेचा माज कोकणातील जनतेने त्या त्या वेळी उतरवला आहे. एकवेळ हे प्रकरण अन्य मार्गाने मिटवले जाईल, तडजोड केली जाईल. मात्र सिंधुदुर्गातील जनता हे बघतेय. ‘ये लोग सब जानते है”, असंही त्यांनी सांगितले.

प्रमोद जठार म्हणाले, “तो कोणाचाही मुलगा असुदे, येथील जनता त्यांना माफ करणार नाही. कोरोनाच्या काळात जिवाची बाजी लावून पोलीस, डॉक्टर, नर्सेस काम करत आहेत. जर यांना कुणी अपशब्द बोलत असेल आणि वाईट वागणूक देत असेल तर अशा लोकांना जनता माफ करणार नाही.”

“सत्तेचा माज असू नये, सत्ता ही कायमची नसते”, असंही त्यांनी गितेश राऊत प्रकरणावर सांगितले.

निलेश राणेंचे ट्वीट

“शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या मुलाने एका पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. भर पावसात एक पोलीस कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत आहे. खासदाराचा मुलगा दारु पिऊन शुद्धीत नसल्यासारखा त्याला धमकी देतो. दारु पिऊन गाडी वेडीवाकडी चालवली तर पोलीस पकडणारच. याप्रकरणी संबंधित तरुणाविरोधात कलम 353 आणि 185 अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला हवा”, असं निलेश राणे त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर म्हणाले आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

याप्रकरणी निलेश राणे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “ही घटना सिंधुदुर्गातील कणकवली बाजारपेठेत संध्याकाळी 5 ते 6 वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांशी हुज्जत घालणारा मुलगा 100 टक्के खासदार विनायक राऊत यांचा मुलगा आहे. व्हिडीओत दिसणारी गाडी विनायक राऊत यांच्या मुलाच्या नावावर आहे. याशिवाय व्हिडीओत तो मुलगा स्वत: खासदारांचा मुलगा असल्याचं सांगत आहे”, असं निलेश राणे म्हणाले.

“एका पोलीस कर्मचाऱ्याला ज्या भाषेत खासदारांचा मुलगा धमकी देतोय तो एक गुन्हा आहे. कलम 353 अंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल व्हायला हवा. पण खासदारांचा मुलगा असल्याने अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. खरंतर दारु पिऊन तो असे प्रकार करत असेल तर त्याला तुरुंगातच टाकलं पाहिजे “, अशी टीका निलेश राणे यांनी केली.

संबंधित बातम्या :

विनायक राऊतांच्या पुत्राची पोलिसांशी हुज्जत? निलेश राणेंकडून व्हिडीओ शेअर

भर रस्त्यात पोलिसांशी हुज्जत, संबंधित तरुण विनायक राऊतांचा मुलगा, निलेश राणेंचा दावा