भाजप तीन राज्य गमावत होतं, मोदी पुण्यातील विकासकामांचा आढावा घेत होते!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

नवी दिल्ली : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही तीन राज्य भाजच्या हातातून जेव्हा निसटत होती, तेव्हा भाजपसाठी ब्रँड असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करत होते? हा सर्वांसाठीच उत्सुकतेचा विषय आहे. एकामागोमाग एक विजय मिळवणाऱ्या भाजपला स्वतःच्या बालेकिल्ल्यातच दणका बसला. अगदी ग्रामपंचायत निवडणूक जिंकली तरीही तातडीने प्रतिक्रिया देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री साडे नऊ वाजता […]

भाजप तीन राज्य गमावत होतं, मोदी पुण्यातील विकासकामांचा आढावा घेत होते!
Follow us on

नवी दिल्ली : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही तीन राज्य भाजच्या हातातून जेव्हा निसटत होती, तेव्हा भाजपसाठी ब्रँड असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करत होते? हा सर्वांसाठीच उत्सुकतेचा विषय आहे. एकामागोमाग एक विजय मिळवणाऱ्या भाजपला स्वतःच्या बालेकिल्ल्यातच दणका बसला. अगदी ग्रामपंचायत निवडणूक जिंकली तरीही तातडीने प्रतिक्रिया देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री साडे नऊ वाजता काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

भाजपचे आकडे मागे-पुढे होत असल्याचं मोदीही टीव्हीवर पाहत होते का? तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. कारण, पंतप्रधान मोदी त्यांच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार दिवसभर व्यस्त होते. निवडणुकीच्या निकालाकडे त्यांनी बुधवारच्या आरोग्य संमेलनात द्यायचं असलेलं भाषण तयार केलं. ते हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर संसदेत पोहोचले होते.

‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार, मोदींच्या अत्यंत जवळच्या एका व्यक्तीने सांगितलं की, “ते मंगळवारीही इतर दिवसांच्या वेळापत्रकाप्रमाणेच व्यस्त होते. मोदी साडे दहा वाजता संसदेत पोहोचले आणि त्यांनी पारंपरिक पद्धतीने माध्यमांशी संवाद साधला. संसदेच्या कामकाजातही सहभाग घेतली. दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि दिवंगत मंत्री अनंत कुमार यांना श्रद्धांजली देण्यासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं होतं.”

मंगळवारी दुपारी मोदींनी उत्तर प्रदेशमधील विकासकामांचा आढावा घेतला. त्यानंतर काही महत्त्वाच्या अगोदरच ठरलेल्या बैठकांना हजेरी लावली, असंही एका अधिकाऱ्याने सांगितलं. मोदी 16 तारखेला रायबरेली आणि प्रयागराजमध्ये काही योजनांचा शुभारंभ करणार आहेत. संध्याकाळपर्यंत भाजपने तीन राज्य गमावल्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालं होतं. तरीही मोदींनी याकडे लक्ष न देत, त्यांच्या नियोजित कार्यक्रमाचं भाषण पूर्ण केलं, असंही सांगण्यात येतंय.

छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील पराभवानंतरही मोदींनी दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सकाळी नऊ वाजताच नव्या दिवसाची सुरुवात केली. त्यांनी विज्ञान भवनातील कार्यक्रमात सहभाग घेतला. यानंतर मोदींनी संसदीय कामकाजासंदर्भात वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. महाराष्ट्रातील कल्याणकारी योजना आणि पुण्यातील विकासकामांचा त्यांनी नंतर आढावा घेतला. मोदी 18 तारखेला महाराष्ट्रात विविध ठिकाणी कार्यक्रमासाठी जाणार आहेत. 14 आणि 15 डिसेंबर रोजी तामिळनाडू आणि केरळमधील बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची प्रक्रियाही मोदींनी पूर्ण केली, असं अधिकाऱ्याने सांगितलं.