भाजपची वेबसाईट हॅक, आक्षेपार्ह मेसेज पोस्ट

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : भारतीय जनता पक्षाची अधिकृत वेबसाईट हॅक झाली असून, आक्षेपार्ह शब्दात काही वाक्य वेबसाईटच्या होम पेजवर पोस्ट करण्यात आले आहेत. www.bjp.org  ही भाजपची अधिकृत वेबसाईट हॅक झाली आहे. वेबसाईट हॅकिंगबाबत अद्याप भाजपकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आली नाही. मात्र, फेसबुक आणि ट्विटरवर भाजपच्या वेबसाईटचे हॅकिंगनंतरचे फोटो पोस्ट केले जात आहेत. दहशतवादासंदर्भात विशेष अभ्यास करणारे पत्रकार आणि […]

भाजपची वेबसाईट हॅक, आक्षेपार्ह मेसेज पोस्ट
BJP
Follow us on

मुंबई : भारतीय जनता पक्षाची अधिकृत वेबसाईट हॅक झाली असून, आक्षेपार्ह शब्दात काही वाक्य वेबसाईटच्या होम पेजवर पोस्ट करण्यात आले आहेत. www.bjp.org  ही भाजपची अधिकृत वेबसाईट हॅक झाली आहे.

वेबसाईट हॅकिंगबाबत अद्याप भाजपकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आली नाही. मात्र, फेसबुक आणि ट्विटरवर भाजपच्या वेबसाईटचे हॅकिंगनंतरचे फोटो पोस्ट केले जात आहेत.

दहशतवादासंदर्भात विशेष अभ्यास करणारे पत्रकार आणि टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राचे प्रतिनिधी राज शेखर झा यांच्या माहितीनुसार, भाजपची वेबसाईट पाकिस्तानी हॅकरने हॅक केली आहे.

आम आदमी पक्षाचे सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट अंकित लाल यांनी पोस्ट केला भाजपच्या वेबसाईटचा स्क्रीनशॉट :

What’s going on with the @BJP4India website? pic.twitter.com/5RpCDzIJkp

— Ankit Lal (@AnkitLal) March 5, 2019