नागपुरात गंगाजमुना परिसरात वसुली, बोगस पोलिसाला खऱ्या पोलिसांनी इंगा दाखवला!

| Updated on: Jun 29, 2019 | 3:11 PM

अनेकांकडून पैशाची वसुली करणाऱ्या बोगस पोलिसाला खऱ्या पोलिसांनी इंगा दाखवला. दिलीप टापरे असं अटकेत असलेल्या बोगस पोलिसाचं नाव आहे.

नागपुरात गंगाजमुना परिसरात वसुली, बोगस पोलिसाला खऱ्या पोलिसांनी इंगा दाखवला!
Follow us on

नागपूर : अनेकांकडून पैशाची वसुली करणाऱ्या बोगस पोलिसाला खऱ्या पोलिसांनी इंगा दाखवला. दिलीप टापरे असं अटकेत असलेल्या बोगस पोलिसाचं नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो पोलीस म्हणून लोकांकडून वसुली करत होता, अशी धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे.

नुकतंच नागपुरातील लकडगंज येथील गंगाजमुना परिसरात तो बोगस पोलीस बनून वसुली करत होता. पण हा प्रकार खऱ्या पोलिसांच्या लक्षात आला आणि लकडगंज पोलिसांनी दिलीप टापरेला बेड्या ठोकल्या.

दिलीप उद्धवराव टापरे हा बोगस पोलीस मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील असून, नागपुरात गाडगेबाबानगर परिसरात राहतो. त्याला अटक केल्यानंतर आरोपी दिलीप यांच्याकडून पोलिसांनी बोगस ओळखपत्र, रोख 2600 रुपये आणि दुचाकी जप्त केली.

लकडगंज पोलीस स्टेशनचे एएसआय कणकदळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम १७०, १७१ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पण नागपूर सारख्या शहरात बोगस पोलिसाच्या या वसुलीनं सर्वत्र खळबळ उडाली आहे.