Lockdown : नांदेडमध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई, दहा दिवसात 53 लाखांच्या दंडाची वसुली

| Updated on: Apr 02, 2020 | 1:28 PM

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची घोषणा करण्यात (Break traffic rules nanded during lockdown) आली.

Lockdown : नांदेडमध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई, दहा दिवसात 53 लाखांच्या दंडाची वसुली
Follow us on

नांदेड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची घोषणा करण्यात (Break traffic rules nanded during lockdown) आली. या लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवासोडून बाकी सर्व बंद करण्यात आले आहे. तसेच लॉकडाऊन असतानाही काही लोक नांदेडमध्ये वाहतूक नियमाचे उल्लघंण करत होते. त्यामुळे पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करत दहा दिवसात तब्बल 53 लाख रुपयांच्या दंडाची वसुली (Break traffic rules nanded during lockdown) केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात काहीजण विना परवाना वाहन चालवत होते. विना परवाना वाहन चालवणाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. तसेच विनाकारण फिरणारे महाभागही मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. त्यामुळे नांदेड वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

लॉकडाऊन दरम्यान नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात ही कारवाई सातत्याने चालूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. पोलिसांच्या या कठोर कारवाईमुळे नांदेडमध्ये विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या संख्येत घट होईल, असं म्हटलं जात आहे.

दरम्यान, राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. राज्यात आतापर्यंत 300 पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच देशभरात 1600 पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.