लग्नात नवरा-नवरीकडून कांद्याचा हार, मित्रांकडूनही अडीच किलो कांदा गिफ्ट

| Updated on: Dec 14, 2019 | 1:33 PM

वाराणसीत नवरा-नवरीने फुलांच्या व्यतिरिक्त कांदा आणि लसूनचे हार (Onion gift in wedding) एकमेकांना घातले. तसेच लग्नात आलेल्या पाहुण्यांनीही त्यांना कांदा आणि लसूनच्या टोपली गिफ्ट म्हणून दिल्या.

लग्नात नवरा-नवरीकडून कांद्याचा हार, मित्रांकडूनही अडीच किलो कांदा गिफ्ट
Follow us on

लखनऊ : वाराणसीत नवरा-नवरीने फुलांच्या व्यतिरिक्त कांदा आणि लसूनचे हार (Onion gift in wedding) एकमेकांना घातले. तसेच लग्नात आलेल्या पाहुण्यांनीही त्यांना कांदा आणि लसून गिफ्ट म्हणून दिले आहे. गेल्या काही दिवसात कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यावर विरोध दर्शवण्यासाठी नवं दाम्पत्याने (Onion gift in wedding) या पद्धतीचे लग्न केले.

देशातील वेगवेगळ्या ठिकाणी कांद्याचे भाव शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत पोहोचले आहे. वाराणसीत कांद्याची किंमत 120 रुपये प्रति किलो गेली आहे. बंगळुरु आणि दक्षिण भारतातील इतर शहरात कांद्याचे भाव दोनशे रुपये झाले आहेत. या वाढलेल्या किंमतीमुळे अनेकजण याचा विरोध करत आहेत.

तामिळनाडूत नवऱ्याच्या मित्रांकडून कांदे गिफ्ट

तामिळनाडूतही एका तरुणाच्या लग्नात त्याच्या मित्रांनी त्याला एक किलो कांदा गिफ्ट केला आहे होता. त्यावेळी कांद्याची किंमत दोनशे रुपये सुरु होती. त्यांनी 500 रुपयांचे कांदे विकत घेऊन नवऱ्याला गिफ्ट दिले.

दरम्यान, देशात कांद्याच्या वाढलेल्या किमतीमुळे सामान्य जनता त्रस्त आहे. कांद्याच्या भावात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासाठी परदेशातून कांदा आयात करण्यात आला आहे. देशात महागाईने डोकं वर काढलेले असताना कांद्याचे भाव वाढले आहेत. हे सर्वांसाठी त्रासदायक ठरत आहे. या वाढलेल्या भावाचा जनतेकडून निषेध करण्यात येत आहे.