चार दिवसात लोणावळ्यातील भुशी डॅम हाऊसफुल्ल

| Updated on: Jul 01, 2019 | 3:21 PM

पावसाच्या जोरदार सरीमुळे भुशी धरण तर भरलंच, पण या मार्गावरील डोंगरांगांमधून धबधबे वाहू लागले आहेत.   शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधत लोणावळ्यात अनेक पर्यटकांनी हजेरी लावली.

चार दिवसात लोणावळ्यातील भुशी डॅम हाऊसफुल्ल
Follow us on

लोणावळा (पुणे) : लोणावळा शहरातील पावसाळी पर्यटनाचं आकर्षण असलेले भुशी धरण आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले. धरण फुल्ल होऊन सांडव्यावरुन पाणी वाहू लागलं आहे. तब्बल तीन आठवडे उशिराने सुरु झालेल्या मान्सूनने, अवघ्या चार दिवसातच भुशी धरण ओव्हरफ्लो झाले. तीन दिवसात शहरात 456 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

घाट माथ्यावरील या पावसाळी पर्यटनाचे ठिकाण असलेल्या खंडाळा आणि लोणावळा परिसरात गेल्या चार दिवसापासून सतत पाऊस कोसळत आहे. पावसाचे आगमन झाल्याने वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी येथील पर्यटनस्थळांकडे धाव घेतली आहे.

पावसाच्या जोरदार सरीमुळे भुशी धरण तर भरलंच, पण या मार्गावरील डोंगरांगांमधून धबधबे वाहू लागले आहेत.   शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधत लोणावळ्यात अनेक पर्यटकांनी हजेरी लावली. भुशी धरण, लायन्स पाँईट, सहारा पूल धबधबा, शिवलिंग पाँईट,  राजमाची, कार्ला आणि भाजे लेणी हा परिसरही पर्यटकांचं आकर्षण ठरतो.