चारा नसेल, तर जनावरं पाहुण्यांकडे सोडा : राम शिंदे

| Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM

अहमदनगर : राज्यात दुष्काळी स्थिती असातना, राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. मात्र, राज्यातले मंत्री शेतकऱ्यांवरच अरेरावी करत आहेत की काय, असं वाटावं, अशी घटना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीत घडली आहे. राज्याच्या जलसंधारण मंत्र्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राज्याचे मंत्री असलेले राम शिंदे हे शेतकऱ्यांना चारा छावण्यावरुन ‘सल्ला’ देताना दिसत […]

चारा नसेल, तर जनावरं पाहुण्यांकडे सोडा : राम शिंदे
Follow us on

अहमदनगर : राज्यात दुष्काळी स्थिती असातना, राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. मात्र, राज्यातले मंत्री शेतकऱ्यांवरच अरेरावी करत आहेत की काय, असं वाटावं, अशी घटना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीत घडली आहे. राज्याच्या जलसंधारण मंत्र्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राज्याचे मंत्री असलेले राम शिंदे हे शेतकऱ्यांना चारा छावण्यावरुन ‘सल्ला’ देताना दिसत आहेत.

चारा नसेल, तर जनावरं पाहुण्यांकडे नेऊन सोडा, असा सल्ला दस्तुरखुद्द राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिला आहे. राम शिंदे यांच्या या वक्तव्यावर सध्या सर्वच स्तरातून टीका होत आहे. हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अहमदनगरमधील पाथर्डी येथे चारा छावणीसंदर्भात काही शेतकरी राम शिंदे यांच्याकडे समस्या मांडण्यासाठी आले होते. त्यावेळी राम शिंदे यांनी हे वक्तव्य केले.

पाहा व्हिडीओ :

मंत्री राम शिंदे यांचं स्पष्टीकरण

शहरामध्ये छावण्या उघडायला परवानगी द्या, अशी त्यांची मागणी होती. पण नियमानुसार, शहरात छावण्या उघडण्यास परवानगी नसते. मी तेच समजावून सांगितले. माझ्या विधानाचा विपर्यास केला. मीही गावाकडून आलोय. मला स्थिती माहित आहे. माझ्याकडून अशी वादग्रस्त वाक्यरचना होऊच शकत नाही. – जलसंधारण मंत्री राम शिंदे

रघुनाथदादा पाटलांची सडकून टीका

जलसंधारण मंत्र्यांनी शेतकऱ्यांना आधार द्यायला हवा होता, पाणी द्यायला हवा होता, चारा द्यायला हवा होता. मात्र तसे होताना दिसत नाही. आणि यांना काय माहित आम्हा शेतकऱ्यांचे पाहुणे कुठे आहेत, पाहुण्यांच्या गावात तरी पाणी आहे का? पाहुण्यांच्या गावातही दुष्काळ आहे. तिथे काय सुकाळ आहे का? लोकांना आधार देण्याऐवजी थट्टा केली जात आहे. – शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील

शेतकऱ्यांसाठी सरकारने आपली तिजोरी मोकळी करायला हवी. मदतीसाठी युद्धपातळीवर काम करायला हवे. ते न करता, शेतकऱ्यांना सल्ले दिले जात आहे, शहाणपण शिकवले जात आहे. यांना धडा शकवला गेला पाहिजे, अशीही टीका रघुनाथदादा पाटील यांनी राम शिंदे यांच्यावर केली.