वायूसेना आता आणखी शक्तीशाली होणार, केंद्र सरकार 200 लढाऊ विमानं खरेदी करणार

| Updated on: Jan 13, 2020 | 9:10 AM

भारतीय वायूसेनेतील विमानांची संख्या कमी होत असल्यामुळे केंद्र सरकार 200 विमानं खरेदी (Central government buy aircraft) करणार आहेत.

वायूसेना आता आणखी शक्तीशाली होणार, केंद्र सरकार 200 लढाऊ विमानं खरेदी करणार
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेतील विमानांची संख्या कमी होत असल्यामुळे केंद्र सरकार 200 विमानं खरेदी (Central government buy aircraft) करणार आहेत. “लवकरच वायूसेनेला 200 लढाऊ विमानं मिळणार आहेत. तसेच लढाऊ विमानांमध्ये वाढ करण्यासाठी हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) सोबत करार सुरु आहे”, अशी माहिती संरक्षण सचिव अजय कुमार यांनी (Central government buy aircraft) दिली.

“एचएएल कंपनी 83 लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस मार्क 1 तयार करणार आहेत. या 83 विमानांशिवाय इतर 110 विमानांचे प्रस्ताव मागवले आहेत. अशाप्रकारे 200 लढाऊ विमानं खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु आहे”, असं अजय कुमार यांनी सांगितले.

“विमानं लवकरात लवकर तयार करण्यासाठी यावर्षी एचएएलसोबत करार करण्यात येणार आहे. पहिले लढाऊ विमांनाचे डिझाईन फायनल केले जाईल. यानंतर 8 ते 10 एअरक्राफ्ट तयार करण्यात येणार आहेत”, असंही अजय कुमार यांनी सांगितले.

“जर आपल्याला आऊटसोर्सिंगची गरज पडली तर आपण यापेक्षाही पुढे जाऊ. सध्या भारताच्या वायूसेनेकडे मिराज 2000, 30 सुखोई, मिग 29, जॅग्वॉर आणि मिग 21 बायसन लढाऊ विमानं आहेत”, असंही अजय कुमार म्हणाले.