पंतप्रधान मोदींच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यानंतर चीनचा तिळपापड

| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

इटानगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशचा दौरा करत विविध विकासकामांचं भूमीपूजन केलं. मोदींच्या या दौऱ्यावर चीनने आक्षेप घेत हा दौरा सीमीप्रश्न आणखी बिघडवू शकतो, असं म्हटलंय. दुसरीकडे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने चीनचा हा दावा फेटाळत अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं म्हटलंय. इतर राज्यांप्रमाणेच अरुणाचलही आमचा अविभाज्य भाग असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट […]

पंतप्रधान मोदींच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यानंतर चीनचा तिळपापड
Follow us on

इटानगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशचा दौरा करत विविध विकासकामांचं भूमीपूजन केलं. मोदींच्या या दौऱ्यावर चीनने आक्षेप घेत हा दौरा सीमीप्रश्न आणखी बिघडवू शकतो, असं म्हटलंय. दुसरीकडे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने चीनचा हा दावा फेटाळत अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं म्हटलंय. इतर राज्यांप्रमाणेच अरुणाचलही आमचा अविभाज्य भाग असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं.

शनिवारी पंतप्रधान मोदींनी विविध विकासकामांचं भूमीपूजन केलं, तर काही योजनांचं लोकार्पणही केलं. या हजारो कोटींच्या योजनांमध्ये ग्रीनफिल्ड एअरपोर्ट, रस्ते, रेल्वे मार्ग अशा विविध विकासकामांचा समावेश आहे. अरुणाचल प्रदेशचं दळणवळण वाढवणं आणि उर्वरित भारताशी कनेक्ट करणं या दृष्टीने अनेक कामं हाती घेण्यात आले आहेत.

मोदींच्या दौऱ्यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आक्षेप घेतला. यानंतर नवी दिल्लीतून भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही चीनला योग्य स्पष्टीकरण दिलं. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य घटक आहे. भारतीय नेते त्याचप्रमाणे अरुणाचलचा दौरा करतील, जसा इतर भागात केला जातो, असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.

चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता हुआ चुनिइंग यांनी म्हटलं होतं, की “भारत-चीन सीमाप्रश्नावर चीनची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही अरुणाचल प्रदेशला कधीही मान्यता दिलेली नाही आणि भारतीय नेते तिथे जातील तेव्हा आम्ही आक्षेप घेतलेला आहे. भारतीय नेत्यांनी चीनची चिंता समजून घ्यावी. दोन्ही देशांचं हित लक्षात घेत फायदे आणि चिंता यांचा सन्मान करावा.”

काय आहे अरुणाचल प्रदेशचा वाद?

उत्तर पूर्व राज्य अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे. त्यामुळे अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग असल्याचं चीन मान्य करत नाही. या सीमाप्रश्नासंबंधी दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत 21 वेळा चर्चा झाली आहे. भारत-चीन वादात 3488 किमी लांबीच्या Line of Actual control चा समावेश आहे.

अरुणाचल प्रदेशात हजारो कोटींच्या योजनांचा शुभारंभ

यूपीए सरकारने सीमा प्रश्न आणि अरुणाचल प्रदेशची कधीही चिंता केली नाही, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर टीका केली. शिवाय आतापर्यंत अरुणाचलसाठी 44 हजार कोटी रुपये दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. मोदींनी अरुणाचलमधील होलोंगीमध्ये ग्रीनफिल्ड विमानतळाचं भूमीपूजन केलं. शिवाय लोहित जिल्ह्यातील तेझू विमानतळाची क्षमता वाढवण्यासाठी अपग्रेडेशन कामाचंही उद्घाटन केलं.

तेझू विमानतळ हे गुवाहटी, जोरहाट आणि होलोंगी विमानतळाशी जोडलं जाईल, ज्यामुळे अरुणाचलमधील फळे, फुले आणि प्रत्येक वस्तू देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात नेता येईल, असं मोदी म्हणाले. रेल्वे प्रकल्प आणि विमानतळांमुळे अरुणाचलच्या पर्यटनाला चालना मिळेल, ज्यामुळे तरुणांना नोकऱ्या उपलब्ध होतील, असंही त्यांनी सांगितलं.