तुम्हीही मुलांवर 100 पैकी 100 मार्क आणण्यासाठी दबाव टाकता?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

नवी दिल्ली : सध्या सगळीकडे दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. अनेक पालकांचा मुलांवर पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी दबाव असतो. याच विषयावर भाष्य करणारा लघुपट टीव्ही 9 भारतवर्षने रिलीज केलाय. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विनोद कापरी यांनी या लघुपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. टीव्ही 9 भारतवर्ष हे हिंदी चॅनल लवकरच लाँच होणार आहे. त्यानिमित्ताने हा लघुपट चॅनलकडून […]

तुम्हीही मुलांवर 100 पैकी 100 मार्क आणण्यासाठी दबाव टाकता?
Follow us on

नवी दिल्ली : सध्या सगळीकडे दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. अनेक पालकांचा मुलांवर पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी दबाव असतो. याच विषयावर भाष्य करणारा लघुपट टीव्ही 9 भारतवर्षने रिलीज केलाय. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विनोद कापरी यांनी या लघुपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. टीव्ही 9 भारतवर्ष हे हिंदी चॅनल लवकरच लाँच होणार आहे. त्यानिमित्ताने हा लघुपट चॅनलकडून रिलीज करण्यात आलाय.

सर्वात जास्त दुर्लक्षित विषयांवर भाष्य केलं जावं हा चॅनलचा प्रयत्न आहे. याचाच भाग म्हणून चिठ्ठी हा लघुपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. साडे पाच मिनिटांचा चिठ्ठी हा बरंच काही सांगून जाणारा लघुपट पाहा आणि तो तुमचे मित्र, पालक आणि कुटुंबीयांनाही दाखवा.

पाहा संपूर्ण लघुपट :