शिर्डी विमानतळावर विमान धावपट्टीवरुन घसरलं, मोठी दुर्घटना टळली

| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

शिर्डी : स्पाईसजेटच्या विमानाची मोठी दुर्घटना शिर्डी विमानतळावर टळली आहे. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरुप आहेत. विमानाने लँडिंगनंतर धावपट्टी सोडली आणि ही दुर्घटना घडली. या घटनेत विमानाचं एक चाक तुटल्याची माहिती आहे. दिल्लीहून हे विमान आलं होतं. दिल्लीतून 180 प्रवासी घेऊन B737-800 या विमानाने शिर्डीसाठी उड्डाण घेतली होती. सोमवारी दुपारी ही घटना घडली. विमानाने लँडिंग केल्यानंतर […]

शिर्डी विमानतळावर विमान धावपट्टीवरुन घसरलं, मोठी दुर्घटना टळली
Follow us on

शिर्डी : स्पाईसजेटच्या विमानाची मोठी दुर्घटना शिर्डी विमानतळावर टळली आहे. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरुप आहेत. विमानाने लँडिंगनंतर धावपट्टी सोडली आणि ही दुर्घटना घडली. या घटनेत विमानाचं एक चाक तुटल्याची माहिती आहे. दिल्लीहून हे विमान आलं होतं. दिल्लीतून 180 प्रवासी घेऊन B737-800 या विमानाने शिर्डीसाठी उड्डाण घेतली होती.

सोमवारी दुपारी ही घटना घडली. विमानाने लँडिंग केल्यानंतर अचानक धावपट्टी सोडली. वैमानिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेनंतर प्रवाशांनी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. स्पाईसजेटकडून सध्या घटनेची चौकशी केली जात आहे. शिवाय धावपट्टी सध्या बंद करण्यात आली असून दुरुस्तीचं काम सुरु आहे.

घटनेचा व्हिडीओ :