घोडगंगा कारखान्यावरुन अजित पवारांना शह, भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश

| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

मुंबई/पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना दणका देण्याची तयारी फडणवीस सरकारने केल्याचं चित्र आहे. कारण पुण्यातील घोडगंगा साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. घोडगंगा साखर कारखान्यावर कामगारांच्या नावावर कर्ज उचलल्याचा आरोप आहे. तसंच कारखान्याची पाच एकर जमीन खासगी संस्थेला दिल्याचाही […]

घोडगंगा कारखान्यावरुन अजित पवारांना शह, भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश
Follow us on

मुंबई/पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना दणका देण्याची तयारी फडणवीस सरकारने केल्याचं चित्र आहे. कारण पुण्यातील घोडगंगा साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. घोडगंगा साखर कारखान्यावर कामगारांच्या नावावर कर्ज उचलल्याचा आरोप आहे. तसंच कारखान्याची पाच एकर जमीन खासगी संस्थेला दिल्याचाही ठपका कारखान्यावर आहे. या प्रकारामुळे सहकारी कारखाना तोट्यात मात्र अजित पवारांचे निकटवर्तीय अध्यक्ष अशोक पवार यांच्या नातेवाईकाचा खासगी कारखाना तेजीत, असं चित्र इथे पाहायला मिळत आहे.

अशोक पवार हे घोडगंगा साखर कारखान्याचे चेअरमन आहेत, मात्र अशोक पवार यांचे आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या व्यंकटेश कृपा साखर कारखान्याकडे जास्त लक्ष असल्याचा आरोप आहे.

कारखान्यातील भ्रष्टाचाराविरोधात शेतकऱ्यांचं कारखान्याबाहेर उपोषण सुरु आहे. उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सहकार मंत्र्यांनी घोडगंगा साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर तब्बल 181 कोटी रुपयांचं कर्ज आहे. 2018-2019 च्या अंदाजपत्रकात कारखान्याने 37 कोटी 94 लाख रुपयांची कर्जफेड केल्याचे नमूद केले आहे. मात्र तरीही कारखान्यावर अद्याप 150 कोटी रुपयांचं कर्ज आहे. सहकारी कारखाने बंद पाडायचे आणि खासगी कारखाने सुरु ठेवायचे असा घाट असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी क्रांतीवीर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

संबंधित बातम्या 

अरे, ते मासे कुठले आहेत? कायतरी तिसरंच व्हायचं: अजित पवार  

मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका : अजित पवार  

भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे नेते लवकरच परततील: अजित पवार