कोल्हापुरातील घिसाड गल्लीत दोन गटात तुफान दगडफेक

| Updated on: Jun 05, 2019 | 8:15 AM

दोन्ही बाजूच्या गटाकडून एकमेकावर तुफान दगडफेक करण्यात आली. काचेच्या बाटल्याही एकमेकांवर फेकण्यात आल्या.

कोल्हापुरातील घिसाड गल्लीत दोन गटात तुफान दगडफेक
Follow us on

कोल्हापूर : कोल्हापुरातील घिसाड गल्लीत दोन गटात तुफान वाद झाला. या वादाचं रुपांतर दगडफेकीत झालं. दोन्ही बाजूने तुफान दगडफेक झाल्याने, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांपैकी तीन पोलीस कर्मचारी आणि पाच नागरिक जखमी झाल आहेत.

घिसाड गल्लीत नेहमीप्रमाणे लहान मुलं क्रिकेट खेळत होती. याचवेळी क्रिकेट खेळण्यावरुन लहान मुलांमध्ये वाद झाला आणि मुलांच्या घरापर्यंत पोहोचलं. त्यानंतर घरातल्या मोठ्यांना घटनास्थळी धाव घेतली आणि वादाला मोठं स्वरुप मिळालं. किरकोळ कारणावरुन सुरु झालेल्या वादाचे रुपांतर दगडफेकीत झालं.

दोन्ही बाजूच्या गटाकडून एकमेकावर तुफान दगडफेक करण्यात आली. काचेच्या बाटल्याही एकमेकांवर फेकण्यात आल्या.

घिसाड गल्लीतला हा वाद रोखण्यासाठी दाखल झालेल्या पोलिसांवरही दगडफेक झाली. या गदारोळात तीन पोलीस कर्मचारी आणि पाच नागरिक जखमी झाले. जखमी पोलीस आणि नागिरकांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

दरम्यान, दोन्ही गटातील समाजकंटकांवर पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. घिसाडी गल्लीच्या परिसरात पोलिसांनीही बंदोबस्त वाढवला आहे. शिवाय, नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता, शांतता राखावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.