कोरोनाचा UPSC परीक्षांना मोठा फटका, एकाच जिल्ह्यातून तब्बल 5 हजार परीक्षार्थींची दांडी

| Updated on: Oct 05, 2020 | 12:50 PM

यूपीएससीसाठी जिल्ह्यातून 11 हजार 429 अर्ज भरण्यात आले होते. त्यापैकी 5 हजार 572 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे.

कोरोनाचा UPSC परीक्षांना मोठा फटका, एकाच जिल्ह्यातून तब्बल 5 हजार परीक्षार्थींची दांडी
Follow us on

औरंगाबाद : कोरोनाच्या संकट काळात राज्यात होऊ घातलेल्या यूपीएससी परीक्षांना जबरदस्त फटका बसला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपीएससी परीक्षेसाठी तब्बल 5 हजार परीक्षार्थींनी दांडी मारली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पाच हजार परिक्षार्थीं हे गैरहजर असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे अवघ्या पैकी 5 हजार 572 उमेदवारांनीच परीक्षा दिली आहे. (corona news 5 thousand examiner absent to upsc exam in aurangabad)

यूपीएससीसाठी जिल्ह्यातून 11 हजार 429 अर्ज भरण्यात आले होते. त्यापैकी 5 हजार 572 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. त्यामुळे कोरोनाचा मोठा फटका परीक्षेला बसल्याचं बोललं जात आहे. एकीकडे परीक्षांवर कोरोनाचा परिणाम दिसत असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्यात मराठा समाजाचं आंदोलन पार पडणार आहे.

आज औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं सामूहिक जलसमाधी आंदोलन आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जलसमाधी आंदोलन केलं जात आहे. वैजापूर तालुक्यातील बोर दहेगाव प्रकल्पात आंदोलन पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे सावधानता म्हणून आधीच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त परिसरात लागू करण्यात आला आहे.

खरंतर, मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अशात आता MPSC परीक्षादेखील होणार आहेत. त्यावरही मराठा आंदोलकांनी कडक पवित्रा घेतला आहे. MPSCच्या परीक्षा जर पुढे ढकलल्या गेल्या नाहीत तर राज्यभर उग्र आंदोलन करू असा इशारा मराठा समाजाकडून करण्यात आला आहे. यासंबंधी एक पत्रदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आलं आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधवांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित कडक आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टातून स्थगिती मिळाल्यामुळे परीक्षेची तयारी करणारे राज्यातले मराठी समाजाचे विद्यार्थी नाराज आहेत. त्यांना नेमक्या कुठल्या प्रवर्गात समावेश दिला जाणार आहे याबद्दल अद्याप कुठलीही माहिती नसल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात यावी असं पत्रात लिहिण्यात आलं आहे. जर परीक्षा रद्द झाली नाही तर मराठा समाज राज्यात उग्र आंदोलन करणार असा स्पष्ट इशारा पत्रातून देण्यात आला आहे.

इतर बातम्या –

मराठा समाज MPSC परीक्षांवरून आक्रमक, मुख्यमंत्र्यांना पत्रातून शेवटचा अल्टिमेटम

नेहा कक्कर बोहोल्यावर चढणार, या गायकासोबत बांधणार सात जन्माची गाठ

(corona news 5 thousand examiner absent to upsc exam in aurangabad)