सोलापुरात पुढील दहा दिवस कडकडीत बंद, 25 हजार अँटीजन टेस्ट घेणार

| Updated on: Jul 17, 2020 | 8:48 AM

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आजपासून पुढील दहा दिवसांसाठी 26 जुलैपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली (Curfew in Solapur) आहे.

सोलापुरात पुढील दहा दिवस कडकडीत बंद, 25 हजार अँटीजन टेस्ट घेणार
लॉकडाऊन
Follow us on

सोलापूर : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आजपासून पुढील दहा दिवसांसाठी कडक संचारबंदी लागू करण्यात आली (Curfew in Solapur) आहे. शहरा भोवतालच्या तीस गावातही कडक संचारबंदी आहे. या संचारबंदी दरम्यान एकूण 25 हजार अँटीजन टेस्ट केली जाणार आहे. तसेच या संचराबंदीत हॉस्पिटल्स, औषध दुकाने आणि दूध वगळता इतर सर्व आस्थापना बंद राहणार (Curfew in Solapur) आहे.

दहा दिवसांसाठी म्हणजेच आजपासून 26 जुलैपर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दहा दिवसांच्या कालावधीत नगरपालिका जिल्ह्यातील तब्बल 25 हजार नागरीकांचे अँटिजन टेस्ट करणार आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहेत. त्यासोबत काही ठिकाणी संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. नुकतेच पुण्यातही दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे.

या संचारबंदीमुळे जिल्ह्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी संसर्ग होण्यावर रोख मिळवता येतो. राज्यातील अनेक जिल्ह्यात, शहरात आणि गावामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच रायगड, सातारा, पुणे, पिंपरी चिंचवड आणि बारामतीसह इतर काही ठिकाणी दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

Wardha LockDown | वर्ध्यासह 9 ग्रामपंचायत परिसरात संचारबंदी

Dhule lockdown | धुळ्यात संध्याकाळी 4 ते पहाटे 6 पर्यत कडक संचारबंदी

Raigad Lockdown | 26 जुलैपर्यंत रायगड लॉकडाऊन

Nagpur Lockdown | लॉकडाऊनमुळे नागपूर महापालिकेच्या महसुलावर परिणाम