पब्जी गेम खेळल्याने मानेची नस दबली, विद्यार्थ्याचा मृत्यू

| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

हैदराबाद : पब्जी गेममुळे आतापर्यंत अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. अनेकांनी आपले प्राणही गमावले आहेत. सध्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात हा गेम खेळला जातो. मात्र याचे दुष्परिणाम अत्यंत धोकादायक असल्याचे दिसत आहे. पुन्हा एकदा पब्जी गेममुळे एका 20 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना तेलंगणामधील जगतियाल शहरात घडली आहे. हा विद्यार्थी सलग 45 दिवस ऑनलाईन […]

पब्जी गेम खेळल्याने मानेची नस दबली, विद्यार्थ्याचा मृत्यू
Follow us on

हैदराबाद : पब्जी गेममुळे आतापर्यंत अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. अनेकांनी आपले प्राणही गमावले आहेत. सध्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात हा गेम खेळला जातो. मात्र याचे दुष्परिणाम अत्यंत धोकादायक असल्याचे दिसत आहे. पुन्हा एकदा पब्जी गेममुळे एका 20 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना तेलंगणामधील जगतियाल शहरात घडली आहे. हा विद्यार्थी सलग 45 दिवस ऑनलाईन पब्जी गेम खेळत असल्याने या विद्यार्थाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी 45 दिवस पब्जी गेम खेळत होता. यामुळे त्याची मान दुखू लागली. दरम्यान त्याला हैदराबाद येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

“सलग 45 दिवस पब्जी गेम खेळत असल्याने विद्यार्थ्याची मान दुखू लागली. तसेच माने जवळील नसांमध्ये सूज आली आणि यामुळे त्याला मानही हलवता येत नव्हती. सतत नसांवर दबाव पडल्याने त्या खराब झाल्या. यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाला”, असं रुग्णालयातील डॉक्टर म्हणाले.

याआधीही महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांचा हिंगोलीमध्ये ट्रेनखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. दोन्ही विद्यार्थी पब्जी गेममध्ये इतके मग्न होते की, गेम खेळता खेळता रेल्वे रुळावर आले होते.

हा गेम बंद करण्यासाठी आतापर्यंत अनेकदा आवाज उठवण्यात आला आहे. या गेममध्ये तरुण पूर्णपणे मग्न होतात. गुजरातमध्ये तर हा गेम बॅनही करण्यात आला आहे.