‘बब्बर खालसा’ दहशतवादी संघटनेच्या दोन अतिरेक्यांना अटक, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

| Updated on: Sep 07, 2020 | 4:41 PM

बब्बर खालसा इंटरनॅशनल या दहशतवादी संघटनेच्या दोन अतिरेक्यांना पकडण्यात दिल्ली पोलिसांना यश आलं आहे (Delhi Police arrest two terrorists).

बब्बर खालसा दहशतवादी संघटनेच्या दोन अतिरेक्यांना अटक, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई
Follow us on

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा कौतुकास्पद कामगिरी केली आहे. बब्बर खालसा इंटरनॅशनल या दहशतवादी संघटनेच्या दोन अतिरेक्यांना पकडण्यात दिल्ली पोलिसांना यश आलं आहे. या अतिरेक्यांनी सुरुवातीला पोलिसांवर गोळीबार केला. मात्र, अखेर दोन्ही अतिरेक्यांना पकडण्यात दिल्ली पोलिसांना यश आलं आहे (Delhi Police arrest two terrorists).

दिल्ली पोलिसांनी अतिरेक्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. भूपेंद्र उर्फ दिलावर आणि कुलवंत सिंह असं या दोन्ही अतिरेक्यांची नावे आहेत. ते पंजाबच्या लुधियाना येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून 6 पिस्तूल आणि 40 काडतुसे हस्तगत करण्यात आले आहेत.

हेही वाचा : दिल्लीत ISIS चा अतिरेकी पकडला, दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला

बब्बर खासला इंटरनॅशनल ही एक अतिरेकी संघटना आहे. 1978 साली या संघटनेची स्थापना झाली होती. कॅनडा, जर्मनी, ब्रिटनसह भारतातही काही भागांमध्ये या दहशतवादी संघटनेचे समर्थक आहेत (Delhi Police arrest two terrorists).

दिल्ली पोलिसांनी गेल्या महिन्यात दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला होता. आयसीस या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका संशयित अतिरेक्याला दिल्ली पोलिसांनी 22 ऑगस्ट रोजी अटक केली होती. अबू युसूफ असं त्याचं नाव होतं. त्याच्याजवळही मोठा शस्त्रसाठा मिळाला होता. विशेष म्हणजे त्याच्याजवळ मिळालेल्या प्रेशर कुकरमध्ये 15 किलो आईडी स्फोटक होतं. या स्फोटकाला नंतर निकामी करण्यात आलं होतं.