बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या कट्टर समर्थकाची निर्घृण हत्या

| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

बीड : एकीकडे लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापू लागले असताना, दुसरीकडे बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या झाल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पांडुरंग गायकवाड यांची हत्या झाली असून, गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचे पती पांडुरंग गायकवाड यांची ओव्हर ब्रिजच्या खाली […]

बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या कट्टर समर्थकाची निर्घृण हत्या
Follow us on

बीड : एकीकडे लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापू लागले असताना, दुसरीकडे बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या झाल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पांडुरंग गायकवाड यांची हत्या झाली असून, गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक होते.

परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचे पती पांडुरंग गायकवाड यांची ओव्हर ब्रिजच्या खाली धारदार शस्त्राने हत्या झाली. पांडुरंग गायकवाड यांच्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पांडुरंग गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. त्यामुळे या घटनेला आणखी महत्त्वं आलं आहे. ऐन निवडणुकीच्या काळात राजकारणाशी संबंधित व्यक्तीची हत्या झाल्याने, बीडसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पांडुरंग गायकवाड यांची ज्या ओव्हर ब्रिजखाली हत्या झाली, तिथे संभाजीनगर पोलिस पोहोचले आहेत. हत्येचं कारण अस्पष्ट असलं तरी पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला आहे.