एकासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरणार नाही, नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करु : म्हैसेकर

| Updated on: Mar 17, 2020 | 6:07 PM

"परदेशातून येणाऱ्यांनी कॉरंटाईनचे नियम तोडले तर कठोर कारवाई केली जाईल. नियम तोडणाऱ्यांचं काहीही ऐकलं जाणार नाही", असं पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर (Divisional Commissioner Deepak Mhaisekar) म्हणाले.

एकासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरणार नाही, नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करु : म्हैसेकर
Follow us on

पुणे : “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर 19 मार्चपासून येणाऱ्या सर्व प्रवाशांना 24 तास कॉरंटाईनमध्ये टाकलं जाणार आहे (Divisional Commissioner Deepak Mhaisekar). तिथे तपासणी करुन त्यांना होम किंवा कॉरंटाईन हवं असेल तर होम अन्यथा इन्स्टिट्यूशनल कॉरंटाईन केलं जाईल. परदेशातून येणाऱ्यांनी कॉरंटाईनचे नियम तोडले तर कठोर कारवाई केली जाईल. नियम तोडणाऱ्यांचं काहीही ऐकलं जाणार नाही”, असं पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर (Divisional Commissioner Deepak Mhaisekar) म्हणाले.

प्रशानाचा गेल्या 24 तासातील कामांचा आढावा सांगण्यासाठी म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी प्रशासनाकडून जबाबदारीने काम पार पाडले जात असून या कामात कुणी नियम तोडले तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. मात्र, एका व्यक्तीसाठी पूर्ण समाजाला वेठीस धरणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचा : Corona Update | 31 मार्चपर्यंत ना नवं ड्रायव्हिंग लायसन्स, ना नवं आधार कार्ड

“आज सकाळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा तयारीचा आढावा घेतला. त्यांच्या विभागप्रमुखांची बैठक घेतली. पिंपरी-चिंचवड शंभर पथक स्थापन करण्यात येत आहेत. विदेशातून विमानतळांवर येणाऱ्यांसाठी तोच प्रोटोकॉल वापरला जाईल. त्यात फक्त एक सुधारणा केली जाईल. 19 मार्चपासून विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांना 24 तास कॉरंटाईनमध्ये टाकलं जाईल. तिथे तपासणी करुन त्यांना होम किंवा कॉरंटाईन हवं असेल तर होम अन्यथा इन्स्टिट्यूशनल कॉरंटाईन केलं जाईल. परदेशातून येणाऱ्यांनी कॉरंटाईनचे नियम तोडले तर कठोर कारवाई करणार”, असं म्हैसेकर यांनी सांगितलं.

पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 17 वर

“गेल्या 24 तासात 18 नवीन प्रवासी आलेत. ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत अशा 32 जणांना घरी सोडलं आहे. तर गेल्या 24 तासात 1 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. तो पिंपरी-चिंचवडचा आहे. त्यामुळे आता कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या आ 17 वर गेली आहे”, असं म्हैसेकर यांनी सांगितलं.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शक्य ते सर्व निर्णय घेण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. कोरोनामुळे सर्व सरकारी कार्यालये पुढील 7 दिवस बंद राहणार आहेत. याशिवाय RTO कार्यालयातील नवे परवाने, आधार कार्ड (Driving licence Aadhar card) यासारख्या सुविधा 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत, असं म्हैसेकर म्हणाले.

नवे आधारकार्ड 31 मार्चपर्यंत बंद, आधारकार्डसाठी बायोमेट्रिक करावं लागतं त्यामुळे आता नवे कार्ड देण्यात येणार नाहीत, असं पुणे विभागीय आयुक्त म्हैसेकर म्हणाले. याशिवाय RTO चे सर्व परवाने 31 मार्चपर्यंत बंद दिले जाणार नाहीत, असं पुणे विभागीय आयुक्तांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

Corona effect | सर्व सरकारी कार्यालये पुढील सात दिवस बंद राहणार, सरकारचा मोठा निर्णय