1 ऑक्टोबरपासून ड्रायव्हिंग लायसन्समध्ये बदल होणार

| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

नवी दिल्ली : वाहन चालकांसाठी काही नवीन नियम लागू होत आहेत. येत्या 1 ऑक्टोबरपासून ड्रायव्हिंग लायसन्समध्ये बदल होत आहे. आता ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडीचे आरसी बूक दोन्ही एकसारखेच असणार आहे. प्रत्येक राज्यात ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बूकचा रंग एकच असेल. याबद्दलची सूचना सरकारने जारी केली आहे. ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बूक प्रत्येक राज्यात आतापर्यंत वेगवेगळ्या […]

1 ऑक्टोबरपासून ड्रायव्हिंग लायसन्समध्ये बदल होणार
Follow us on

नवी दिल्ली : वाहन चालकांसाठी काही नवीन नियम लागू होत आहेत. येत्या 1 ऑक्टोबरपासून ड्रायव्हिंग लायसन्समध्ये बदल होत आहे. आता ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडीचे आरसी बूक दोन्ही एकसारखेच असणार आहे. प्रत्येक राज्यात ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बूकचा रंग एकच असेल. याबद्दलची सूचना सरकारने जारी केली आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बूक प्रत्येक राज्यात आतापर्यंत वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये तयार केले जातात. त्यामुळे आतापर्यंत यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. काही राज्यात आरसी बूकची माहिती पुढे आहे तर काही राज्यात मागच्या बाजूला माहिती दिलेली आहे. पण आता नवीन ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बूकवर माहिती ही एकसारखी असेल.

ड्रायव्हिंग लायसन्सनमध्ये नेमके काय बदल करावे यासबंधित गेल्यावर्षी सरकारकडून प्रत्येक राज्यातील आरटीओ अधिकाऱ्यांकडून माहिती मागितली होती. सरकारने या माहितीच्या आधारावर ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बूकमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला.

नवीन ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बूकमध्ये मायक्रोचिप आणि क्युआर कोड असतील. यामुळे आधीचा रेकॉर्ड लपवला जाऊ शकत नाही. क्युआर कोडच्या माध्यमातून वाहन चालकाचा आधीचा सर्व रेकॉर्ड एकाच ठिकाणी पाहता येणार आहे.