जम्मू-काश्मीरमध्ये शाळेत बॉम्बस्फोट

| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील शाळेत बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात दहावी इयत्तेतील सुमारे 10 विद्यार्थी जखमी झाले आहेत. शाळेजवळील हॉस्पिटलमध्ये या विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरु आहेत. जम्मू काश्मीर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, शाळेचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. जखमी विद्यार्थ्यांपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. Srinagar: Jawed Ahmed, teacher at a private school […]

जम्मू-काश्मीरमध्ये शाळेत बॉम्बस्फोट
Follow us on

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील शाळेत बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात दहावी इयत्तेतील सुमारे 10 विद्यार्थी जखमी झाले आहेत. शाळेजवळील हॉस्पिटलमध्ये या विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरु आहेत. जम्मू काश्मीर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, शाळेचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. जखमी विद्यार्थ्यांपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

बॉम्बस्फोटाचं कारण अद्याप कळू शकलं नाही. शिवाय, शाळेच्या परिसरात सध्या एकंदरीतच गोंधळाचं वातावरण आहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये नेण्याचं काम सुरु आहे. त्यांना नीट उपचार मिळावेत म्हणून प्रयत्न सरु आहेत. शिवाय, या स्फोटामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे आई-वडील सुद्धा घाबरलेल्या अवस्थेत आहेत.