मुलीच्या लग्नाच्या महिनाभर आधी वडिलांचा अपघाती मृत्यू

| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

पिंपरी चिंचवड : घरात मुलीच्या लग्नाची धामधूम सुरु होती, लग्नाला अवघा महिना बाकी असताना अपघातात वडिलांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथे ही हृदयद्रवक घटना घडली. वाहतुकीचे नियम न पाळल्याने विजय हरिहर यांना जीव गमवावा लागला आहे. विजय हरिहर हे महावितरणे कर्मचारी होते. विजय हरिहर यांच्या मुलीचं म्हणजे वृषाली हरिहर हिचं 31 मे रोजी लग्न […]

मुलीच्या लग्नाच्या महिनाभर आधी वडिलांचा अपघाती मृत्यू
Follow us on

पिंपरी चिंचवड : घरात मुलीच्या लग्नाची धामधूम सुरु होती, लग्नाला अवघा महिना बाकी असताना अपघातात वडिलांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथे ही हृदयद्रवक घटना घडली. वाहतुकीचे नियम न पाळल्याने विजय हरिहर यांना जीव गमवावा लागला आहे. विजय हरिहर हे महावितरणे कर्मचारी होते.

विजय हरिहर यांच्या मुलीचं म्हणजे वृषाली हरिहर हिचं 31 मे रोजी लग्न आहे. त्यामुळे घरात लग्नासाठीची गडबड आणि धावपळ सुरु आहे. त्यातच वृषालीच्या वडिलांचं म्हणजेच विजय हरिहर यांचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे हरिहर कुटुंबावर दु:खाचं डोंगर कोसळलं आहे.

मुलीच्या लग्नासाठी विजय हरिहर यांनी मे महिन्याच्या एक तारखेपासूनच सुट्टी काढली होती. शुक्रवारी दुपारी कामावरुन घरी परतत असताना, हरिहर यांनी भरधाव वेगाने गाडी नो एन्ट्रीमध्ये घातली. त्याच वेळेस समोरुन आलेल्या दुचाकीची त्यांना जोरदार धडक बसली. यात विजय हरिहर यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

घरात लग्न तोंडावर आलं असताना घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण हरिहर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रस्त्याने वाहने चालवताना सिग्नल तोडणं, गाडी नो एन्ट्रीमध्ये घालणं, असे वाहतुकीचे नियम तोडणं हे कशाप्रकारे आपल्या आणि दुसऱ्यांच्या जीवावर बेतू शकत हेच या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.