बीडमध्ये दोन दिवसांचं बाळ काटेरी झुडपात फेकून आईचं पलायन

| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

बीड : मुलगी पुन्हा एकदा नकोशी का झालीय? बीडमध्ये पुन्हा एकदा हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. बीड जवळील कपिलधार येथे काटेरी झुडपात दोन दिवसांचं स्त्री जातीचं अर्भक आढळून आलंय. दोन दिवसांच्या चिमुकलीला फेकून क्रूर मातेने पलायन केलंय. सुदैवाने या चिमुकलीची प्रकृती सध्या ठिक असून तिच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जन्मानंतर मायेची उब […]

बीडमध्ये दोन दिवसांचं बाळ काटेरी झुडपात फेकून आईचं पलायन
Follow us on

बीड : मुलगी पुन्हा एकदा नकोशी का झालीय? बीडमध्ये पुन्हा एकदा हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. बीड जवळील कपिलधार येथे काटेरी झुडपात दोन दिवसांचं स्त्री जातीचं अर्भक आढळून आलंय. दोन दिवसांच्या चिमुकलीला फेकून क्रूर मातेने पलायन केलंय. सुदैवाने या चिमुकलीची प्रकृती सध्या ठिक असून तिच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जन्मानंतर मायेची उब मिळण्याऐवजी या चिमुकलीला काटेरु झुडपात फेकून देण्यात आलं. बीडपासून केवळ 18 किमी अंतरावर कपिलधारवाडी परिसरात हे गोंडस बाळ फेकण्यात आलं होतं. काटेरी झुडपातून रडण्याचा आवाज येत असल्याने गावातील लोक तिथे पोहचले आणि या निरागस बाळाला ताब्यात घेऊन बीडच्या जिल्हा रुग्णालयात पाठविलं. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना या बाळाला वाचविण्यात यश आलं. काटेरी झुडपात बाळाला फेकण्यात आल्याने बाळाला जखम आणि संसर्ग झाला असून त्यावर उपचार केल्यानंतर बाळ आता ठिक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.

बीड म्हणजे स्त्री भ्रूण हत्येची राजधानी असं समीकरण बनलं होतं. क्रूरकर्मा डॉक्टर सुदाम मुंडे याला शिक्षाही झाली होती. त्यानंतर मुलीच्या जन्मदरात मोठी वाढ झाली असतानाच आता पुन्हा एकदा मुलगी नकोशी झाल्याचं या घटनेने समोर आलंय. दोन दिवसांच्या बाळाला काटेरी झुडपात बेवारस फेकून देणाऱ्या क्रूर मातेला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत.

दोन दिवसाचे स्त्री जातीचे बाळ काटेरी झुडपात मिळाल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या क्रूर मातेचा शोध सुरू आहे. मुलगा-मुलगी समान असल्याचे धडे गिरवीत असतानाच पुन्हा एकदा नकोशीला काटेरी झुडपात फेकून देण्यात आल्याने बीडवासीयांना मुलगी कधीच नकोय हे पुन्हा एकदा या घटनेकडे पाहून सिद्ध होतंय.