नागपुरात सूत कारखान्याला भीषण आग

| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

नागपूर : नागपूरच्या जागनाथ बुधवारी परिसरातील एका सूत बनविण्याच्या कारखान्याला आग लागली. एका इमारतीत हा सूत बनविण्याच्या कारखाना होता. या आगीमुळे आजूबाजूची घरं सुद्धा प्रभावित झाली आहेत. अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांच्या मदतीने या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत या आगीवर नियंत्रण मिळवले. आग विझवल्यानंतरही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा […]

नागपुरात सूत कारखान्याला भीषण आग
Follow us on

नागपूर : नागपूरच्या जागनाथ बुधवारी परिसरातील एका सूत बनविण्याच्या कारखान्याला आग लागली. एका इमारतीत हा सूत बनविण्याच्या कारखाना होता. या आगीमुळे आजूबाजूची घरं सुद्धा प्रभावित झाली आहेत. अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांच्या मदतीने या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत या आगीवर नियंत्रण मिळवले.

आग विझवल्यानंतरही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या कारखान्यात अडकलेल्या तिघांना सुखरुप बाहेर काढण्यात  अग्निशमन विभागाला यश आलं. जागनाथ बुधवारी हा परिसर अतिशय दाटीवाटीचा असल्याने बचाव कार्यात अनेक अडचणी येत होत्या, असे या प्रभागातील नगरसेवकांनी सांगितले.

जागनाथ बुधवारी परिसरात सूत बनवण्याचा काम मोठ्या प्रमाणात चालतं. या इमारतीत सुद्धा सूत बनवण्याचा कारखाना होता. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. तरी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या आगीमुळे कारखान्याचं किती नुकसान झालं हेही अद्याप स्पष्ट झालेलं नाही.