गारठलेल्या द्राक्षांना उब देण्यासाठी शेकोट्या पेटवल्या!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

नाशिक :- थंड हवेचे ठिकाण म्हणून राज्यातील महाबळेश्वरची ओळख आहे. मात्र जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश येथे हिमवर्षाव होत असल्याने उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बंगालच्या समुद्रात चक्रीवादळामुळे राज्यातील तापमानात होत असलेली घसरण, यामुळे निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथे 6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची या हंगामातील निच्चांकी नोंद झाली आहे. द्राक्ष उत्पादकांची पहाट द्राक्ष बागा वाचवण्यासाठी पळापळ होत आहे. या कडाक्याच्या थंडीत द्राक्षांचे नुकसान […]

गारठलेल्या द्राक्षांना उब देण्यासाठी शेकोट्या पेटवल्या!
Follow us on

नाशिक :- थंड हवेचे ठिकाण म्हणून राज्यातील महाबळेश्वरची ओळख आहे. मात्र जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश येथे हिमवर्षाव होत असल्याने उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बंगालच्या समुद्रात चक्रीवादळामुळे राज्यातील तापमानात होत असलेली घसरण, यामुळे निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथे 6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची या हंगामातील निच्चांकी नोंद झाली आहे. द्राक्ष उत्पादकांची पहाट द्राक्ष बागा वाचवण्यासाठी पळापळ होत आहे. या कडाक्याच्या थंडीत द्राक्षांचे नुकसान टाळण्यासाठी पहाटेच्या वेळी द्राक्षबागांमध्ये शेकोट्या पेटवण्यात आल्या आहेत.

गेल्या 10 डिसेंबरपासून थंड वार्‍यांमुळे निफाड तालुका गारठून निघाला आहे. तालुक्यतील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात आज या थंडीच्या हंगामातील 6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची निच्चांकी नोंद झाली. कडाक्याच्या थंडीने तालुका गारठल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून तर चहा नाष्टा असे गरमागरम पदार्थ सेवन करत नागरिक उब मिळवण्याचा प्रयत्न करत आहे .तसेच वाढत्या थंडीमुळे गहू, हरभरा, कांदा ,लसूण ,ज्वारी पिकांना फायदेशीर ठरत आहे .

जानेवारीमध्ये पडणारी थंडी यंदा डिसेंबरमध्ये सुरु झाल्याने तापमानातील घसरणीने द्राक्षवेलीच्या अंतर्गत पेशींचे कार्य मंदावते. त्यामुळे मण्यांची फुगवण थांबते. तसेच परिपक्व अवस्थेतील द्राक्षांना तडेही जाण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे द्राक्षपंढरीत द्राक्ष बागायतदारांनी पहाटेच्या वेळी जागरुकतेने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. थंडीच्या कडाक्यात ऊब मिळवण्यासाठी सहारा शोधणाऱ्या मानवाला झाडांनाही ऊब द्यावी लागत असल्याचे चित्र सध्या द्राक्षपंढरीत दिसत आहे.

असा घसरला निफाड तालुक्यातील पारा

10 डिसेंबर मंगळवारी 9.6 अंश सेल्सिअस नोंद, 11 डिसेंबर मंगलवार रोजी 7.6 अंश सेल्सिअस, 17 डिसेंबर मंगळवार रोजी 7.2 अंश सेल्सिअस, 19 डिसेंबर बुधवारी 6.6 अंश सेल्सिअस तर आज 20 डिसेंबर रोजी 6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची या हंगामातील निच्चांकी नोंद  झाली आहे.