मॅट्रिमोनियल वेबसाईटवरुन फसवलं, IAS भासवून डॉक्टर, वकील, नौदल अधिकारी, जज, महिला DIG ला गंडा

| Updated on: Jan 17, 2020 | 6:06 PM

मॅट्रिमोनियल वेबसाईटवरुन स्वत:ला IAS भासवून एका भामट्याने 25 पेक्षा अधिक महिलांना लग्नाचं अमिष दाखवून फसवलं (Fraud with women on matrimonial website) आहे.

मॅट्रिमोनियल वेबसाईटवरुन फसवलं, IAS भासवून डॉक्टर, वकील, नौदल अधिकारी, जज, महिला DIG ला गंडा
Follow us on

मुंबई : मॅट्रिमोनियल वेबसाईटवरुन स्वत:ला IAS भासवून एका भामट्याने 25 पेक्षा अधिक महिलांना लग्नाचं अमिष दाखवून फसवलं (Fraud with women on matrimonial website) आहे. मॅट्रि्मोनियलवरुन एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांची फसवणूक झाल्याचे समोर आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. आदित्य म्हात्रे असं या भामट्याचं नाव आहे. पोलिसांनी आदित्यला अटक केली असून त्याची अधिक चौकशी (Fraud with women on matrimonial website) करत आहेत.

आदित्य (28) हा पनवेल येथे राहतो. तो इंजिनिअर असून त्याने मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर IAS अधिकाऱ्याचे प्रोफाईल तयार केले आहे. या प्रोफाईलच्या माध्यमातून तो पैशेवाल्या महिलांना शोधायचा. तसेच आपल्या सोशल मीडियावर महागड्या गाड्यांसोबत फोटो काढून पोस्ट करायचा. त्यामुळे अनेक मुलीही त्याच्याकडे आकर्षित होत होत्या. तसेच त्यांना लग्नाचं अमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये घ्यायचा. विशेष म्हणजे आदित्यकडे स्वत:ची अॅक्टिव्हा आहे.

आदित्यने 25 पेक्षा अधिक हायप्रोफाईल महिलांची फसवणूक केल्यामुळे गोरेगाव येथील दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनीही गुन्हा नोंद करत आदित्यच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आदित्यने आतापर्यंत महिला न्यायाधीश, डॉक्टर, नौदल अधिकारी, वकील तसेच मोठ्या उद्योजीका महिलांची फसवणूक केली आहे. यामध्ये एका महिला DIG चाही समावेश आहे. तेसच त्याने आतापर्यंत अनेक महिलांकडून लाखो रुपये लुटले आहेत, असं पोलिसांनी सांगितले.

आदित्यचे लग्न झालेलं असून त्याची पत्नीही इंजीनिअर आहे. त्याला एक मुलगा असून त्याचे कुटुंब भोपाळमध्ये राहतात.