दुकानदाराची अनोखी ऑफर, स्मार्टफोनसोबत कांदे फ्री

| Updated on: Dec 08, 2019 | 1:47 PM

देशात सध्या कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. अनेक राज्यात कांद्याची किंमत 100 रुपये प्रति किलोपेक्षाही अधिक आहे.

दुकानदाराची अनोखी ऑफर, स्मार्टफोनसोबत कांदे फ्री
Follow us on

चेन्नई (तामिळनाडू) : देशात सध्या कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. अनेक राज्यात कांद्याची किंमत 100 रुपये प्रति किलोपेक्षाही अधिक आहे. अशामध्येच तामिळनाडूमधील एका मोबाईल दुकानदाराने स्मार्टफोन (Tamilnadu free onion with smartphone) विकण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे. दुकानदाराने ग्राहकांना मोबाईलसोबत कांदे मोफत देण्याची घोषणा केली आहे.

तामिळनाडूमधील एसटीआर मोबाईलचे मालक सतीश अल यांच्या या अनोख्या कल्पनेमुळे राज्यात त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. सतीश अल स्मार्टफोन खरेदीवर 1 किलो कांदे मोफत (Tamilnadu free onion with smartphone) देत आहेत. आतापर्यंत अनेकांनी त्यांच्या दुकानावर भेट दिली आहे.

“आम्हाला लोकांसाठी काहीतरी करायचे होते. कांद्याचे भाव वाढल्यामुळे आम्ही विचार केला की, स्मार्टफोनसोबत कांदे मोफत देऊ”, असं दुकानदार सतीशने सांगितले.

“मला एक नवीन स्मार्टफोन पाहिजे होता. मी स्मार्टफोन खरेदी केला तेव्हा मला एका हातात स्मार्टफोन आणि एका हातात कांदे दिले. वाढत्या कांद्यांच्या भावामुळे मला मोफत मिळालेले कांदे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे”, असं दुकानातील ग्राहकाने सांगितले.

देशात कांद्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांकडून सरकारविरोधात आंदोलने केली जात आहेत. कांद्याचे वाढते भाव लक्षात घेता परदेशातूनही कांद्याची आयात करण्यात आली. सध्या तामिळनाडूमध्ये कांद्याची किंमत 80 रुपये ते 180 रुपये झाली आहे.