पाच दिवसांपासून बेपत्ता असलेला FTII चा विद्यार्थी अखेर सापडला!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) मधून बेपत्ता झालेला विद्यार्थी उत्तर प्रदेशमध्ये सापडला आहे. शिक्षकांसोबत असभ्य वर्तणूक केल्याप्रकरणी त्याला आणि त्याच्या एका मित्राला निलंबित करण्यात आले होते. मात्र तो विद्यार्थी उत्तर प्रदेशमध्ये आपल्या नातेवाईकांच्या घरी असल्याची माहिती मिळाली आहे. मनोज कुमार असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) […]

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेला FTII चा विद्यार्थी अखेर सापडला!
Follow us on

पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) मधून बेपत्ता झालेला विद्यार्थी उत्तर प्रदेशमध्ये सापडला आहे. शिक्षकांसोबत असभ्य वर्तणूक केल्याप्रकरणी त्याला आणि त्याच्या एका मित्राला निलंबित करण्यात आले होते. मात्र तो विद्यार्थी उत्तर प्रदेशमध्ये आपल्या नातेवाईकांच्या घरी असल्याची माहिती मिळाली आहे. मनोज कुमार असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) मध्ये कला शाखेत द्वितीय वर्षाला शिकत असलेला, मनोजकुमार आणि त्याच्या मित्राने शिक्षकांसोबत असभ्य वर्तन केले होते. यामुळे महाविद्यालयातून मनोजला शिक्षकांची 24 तासात माफी मागावी, अशी नोटीस बजवाण्यात आली होती. मात्र 24 तास उलटूनही मनोजने माफी मागितली नसल्याने महाविद्यालयातून त्याला निलंबित करण्यात आले. यानंतर मनोज अचानक महाविद्यालयाला कोणतेही माहिती न देता निघून गेला. यामुळे महाविद्यालयीन प्रशासनाने डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

महाविद्यालयातून निलबिंत केल्यामुळे मनोज नाराज झाला होता. यामुळे तो कोणालाही न सांगता निघून गेला. महविद्यालयीन प्रशासनाने डेक्कन पोलीस स्टेशनला तक्रार केली. यानंतर पोलिसांनी अधिक तपास करत मनोजचे मित्र आणि नातेवाईकांसोबत संपर्क साधला. यावेळी मनोज आपल्या उत्तर प्रदेशात आपल्या मावशीच्या घरी असल्याचे कळाले.

मनोज एफटीआयआयमध्ये कला शाखेतून आपले शिक्षण पूर्ण करत आहे. मुळचा वाराणसीचा असलेला मनोज सध्या शिक्षणासाठी पुणे येथे एफटीआयआय महाविद्यालयात आपले शिक्षण घेत आहे. तर सहा महिन्यापूर्वी मनोजचे लग्न झाले आहे.