मुलींनो फेसबुकवर फोटो अपलोड करताय?, मग या बदमाशांपासून सावधान

| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई : मुंबई पोलिसांनी एका सोशल मीडियावरच्या रोमिओला अटक केली आहे. सोशल मीडियाचा वापर करून मुलींचे अश्लील फोटो बनवून तो विविध माध्यमावर टाकून त्यांची बदनामी करण्याचे काम करत होता. अश्लील फोटो तयार करुन त्यांना सतवत असे, तसेच अल्पवयीन तरुणींना टार्गेट करुन त्यांची बदनामी करत होता. जानम प्रदीप पोरवाल असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी या […]

मुलींनो फेसबुकवर फोटो अपलोड करताय?, मग या बदमाशांपासून सावधान
Follow us on

मुंबई : मुंबई पोलिसांनी एका सोशल मीडियावरच्या रोमिओला अटक केली आहे. सोशल मीडियाचा वापर करून मुलींचे अश्लील फोटो बनवून तो विविध माध्यमावर टाकून त्यांची बदनामी करण्याचे काम करत होता. अश्लील फोटो तयार करुन त्यांना सतवत असे, तसेच अल्पवयीन तरुणींना टार्गेट करुन त्यांची बदनामी करत होता. जानम प्रदीप पोरवाल असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून अधिक चौकशी केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित मुलींचे फोटो इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवरून काढून त्याला एडिट करत होता. यानंतर वेगवेगळया प्रकारे फोटो एडिट करुन अश्लील किंवा पॉर्नसारखे रूप देत असे. त्यानंतर तो अश्लील फोटो संबधित पीडित मुलींच्या अकाऊंटवर टाकून त्यामध्ये मेसेज करायचा की, माझ्या दिलेल्या नंबरवर संपर्क करा, नाहीतर तुझा फोटो पॉर्न वेबसाईटवर टाकून तुझी बदनामी केली जाईल, अशी धमकी पीडित मुलींना दिली जात होती.

एखाद्या मुलीने घाबरुन त्याच्या नंबरवर कॉल केला तर तो त्या मुलींबरोबर अश्लील संवाद करायचा. घाबरलेल्या दोन पीडित मुलींनी आपल्या बरोबर झालेल्या ह्या प्रकारची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली. आरोपी हा या कामासाठी विविध अॅपचा वापर करत होता. आरोपी हा 20 वर्षांचा असून एका खाजगी महाविद्यालयात शिकत आहे. मात्र पोलिसांनी त्याला अहमदाबादवरून अटक केली आहे.

या अटक केलेल्या आरोपीवर आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 16 मार्च 2019 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. तसेच पोलिसांनी सर्वसामान्य लोकांना आव्हान केलं आहे की, फेसबुक, इन्स्टग्राम किंवा इतर सोशाल मीडियावर आपला फोटो किंवा वैयक्तिक माहिती शेअर करताना सावध राहणे अत्यंत गरजेचं आहे.