केंद्र सरकारचा आणखी एक डिजीटल स्ट्राईक; तब्बल 43 अ‍ॅप्सवर बंदी

| Updated on: Nov 24, 2020 | 7:37 PM

देशाचे सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षेसाठी धोका असल्याचं कारण देत या अॅपवर बंदी घालण्यात आल्याचं कारण सरकारकडून देण्यात आलं आहे.

केंद्र सरकारचा आणखी एक डिजीटल स्ट्राईक; तब्बल 43 अ‍ॅप्सवर बंदी
व्हॉट्सअ‍ॅपने बऱ्याच वेळा या नवीन स्टोरेज मॅनेजमेंट टूलची चाचणी केली आहे. काही बीटा वापरकर्ते आधीपासूनच या सुविधेचा लाभ घेत होते.
Follow us on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) आणखी एक मोठा डिजिटल स्ट्राईक (Digital Strick) केला आहे. यामध्ये भारतातील तब्बल 43 अ‍ॅपला (Apps) ब्लॉक करण्यात आलं आहे. आयटी अ‍ॅक्ट 69 ए अंतर्गत सर्व 43 अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. देशाचे सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षेसाठी धोका असल्याचं कारण देत या अ‍ॅपवर बंदी घालण्यात आल्याचं कारण सरकारकडून देण्यात आलं आहे. (government of india blocks 43 mobile apps in india)

आयटी कायद्याच्या कलम 69 ए अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. बंदी घातलेले सर्व अ‍ॅप्स भारताच्या सार्वभौमत्व, अखंडता, संरक्षण, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचे सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

सरकारने ज्या अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे त्यात अली सप्लायर्स मोबाईल अ‍ॅप, अलिबाबा वर्कबेंच, अली एक्सप्रेस, अलिपा कॅशिअर, लालामूव इंडिया, ड्राईव्ह विथ लालामोव इंडिया, स्नॅक व्हिडिओ, कॅमकार्ड-बिझिनेस कार्ड रीडर, कॅम कार्ड- बीसीआर वेस्टर्न, साऊल, चायनजी सोशल, आशियन डेट, फ्लर्ट विश, गायज ओनली डेटिंग, टूबिट, वी वर्क चायना, फर्स्ट लव लाईव्ह, रीला, कॅशिअर वॉलेट, मँगो टीव्ही, एमजीटीव्ही, वी टीव्ही, वीटीव्ही लाइट, लकी लाईव्ह, टाओबाओ लाईव्ह, डिंग टॉक, आईडेंटिटी वी, आयसोलँड 2, बॉक्स स्टार, हॅपी फिश, जेलीपॉप मॅच, मंचकिन मॅच, कॉनक्विस्टा ऑनलाइन या अ‍ॅपचा समावेश आहे.

गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरला मिळालेल्या अहवालाच्या आधारे या मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आयटी मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. यापूर्वी 29 जून रोजी सरकारने 59 चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. यानंतर 2 सप्टेंबर रोजी आणखी 118 अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. चीनच्या सीमेवर असलेल्या तणावाच्या दरम्यान सरकारचं हे मोठं डिजिटल सर्जिकल स्ट्राइक आहे असं म्हणायला हरकत नाही.

इतर बातम्या – 

Micromax IN Note 1 आणि IN 1b स्मार्टफोन आजपासून विक्रीस उपलब्ध, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

WhatsApp वरील डिलीट केलेले मेसेज वाचायचे आहेत? मग ही ट्रिक वापरा

(government of india blocks 43 mobile apps in india)