दिवसभर वाट पाहूनही पालकमंत्री आलेच नाही, शेतकऱ्यांचा संताप

| Updated on: Jul 05, 2019 | 3:46 PM

हिंगोली : सध्या सर्वच जिल्ह्याचे पालकमंत्री दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. शेतकरी मंत्र्यांना आपल्या समस्या सांगत आहेत. पण हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्यावर शेतकऱ्यांचा संताप झालाय. दिवसभर वाट पाहूनही आपण येत नसल्याचं कळवल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. दिलीप कांबळेंचा दौरा आता उद्यावर ढकलण्यात आलाय. समस्या सांगण्यासाठी शेतकऱ्यांनी दिवसभर मंत्री महोदयांची वाट पाहिली, पण ते येणार नसल्याचं […]

दिवसभर वाट पाहूनही पालकमंत्री आलेच नाही, शेतकऱ्यांचा संताप
Follow us on

हिंगोली : सध्या सर्वच जिल्ह्याचे पालकमंत्री दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. शेतकरी मंत्र्यांना आपल्या समस्या सांगत आहेत. पण हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्यावर शेतकऱ्यांचा संताप झालाय. दिवसभर वाट पाहूनही आपण येत नसल्याचं कळवल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. दिलीप कांबळेंचा दौरा आता उद्यावर ढकलण्यात आलाय. समस्या सांगण्यासाठी शेतकऱ्यांनी दिवसभर मंत्री महोदयांची वाट पाहिली, पण ते येणार नसल्याचं सायंकाळी कळवण्यात आलं.

वसमत तालुक्यातील पिंपरी आणि आंबा या गावाला दिलीप कांबळे भेट देणार होते. तर औंढा तालुक्यातील येहळेगाव सोळंके आणि शहीद पोलीस जवान संतोष चव्हाण यांच्या ब्राह्मणवाडा गावात जाऊन सांत्वनपर भेट देणार होते. पण सकाळी साडेदहा वाजता येणारे मंत्री महोदय दुपारी हिंगोलीत पोहोचले. भेटीतलं पहिलं गाव असलेल्या उमरा येथे त्यांनी 5 वाजता भेट दिली. त्यानंतर शिवणी आणि रामवाडी येथे भेट दिली. यातच सहा वाजले आणि मंत्री महोदयांनी वसमत आणि औंढा तालुक्यातील दौरा पुढे ढकलला.

भरउन्हात दुपारपासून उभे असलेले पिंपरीचे शेतकरी यामुळे चांगलेच संतापले. ऐन दुष्काळातही भाजपच्या मंत्र्यांना दुष्काळग्रस्तांच्या संवेदना समजत नसल्याचा संताप व्यक्त केला. पालकमंत्री येणार म्हणून गावकऱ्यांनी तयारी केली होती, पण सायंकाळचे सात वाजले तरी पालकमंत्री आलेच नसल्याने ग्रामस्थांचा हिरमोड झाला आणि त्यांनी संताप जनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

पालकमंत्र्यांना फोनवरुन संपर्क साधला असता, आता उशीर झाल्यामुळे आजचा दौरा उद्या करणार असल्याचं पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितलं.