Hathras Case: पीडित तरुणीचे 2 वेगवेगळे मेडिकल रिपोर्ट, एकात बलात्कार तर दुसऱ्यात धक्कादायक माहिती

| Updated on: Oct 05, 2020 | 9:28 AM

JNMC च्या फॉरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार, हल्ला झाला त्यावेळी पीडित तरुणी शुद्धीत नव्हती असा उल्लेख करण्यात आला आहे.

Hathras Case: पीडित तरुणीचे 2 वेगवेगळे मेडिकल रिपोर्ट, एकात बलात्कार तर दुसऱ्यात धक्कादायक माहिती
Follow us on

हाथरस (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या हाथरस (hathras gangrape cas) इथं घडलेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पीडित तरुणीने (victim) जखमी अवस्थेत एका व्हिडीओच्या माध्यमातून तिचं लैंगिक शोषण झाले असल्याची माहिती दिली होती. याच्या आठ दिवसांनंतर, अलीगडच्या रुग्णालयात पीडितेच्या वैद्यकीय-कायदेशीर तपासणीत खाजगी भागात, ‘कम्पलीट पेनिट्रेशन’, ‘गळा आवळला’ आणि ‘तोंड बांधलं’ असा उल्लेख केला गेला होता. आता त्याच रुग्णालयाचा आणखी एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यात खळबळजनक माहिती देण्यात आली आहे. (hathras gangrape case 2 different medical reports of victim)

अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी (AMU) जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजने (JNMC) त्यांच्या अंतिम अहवालात फॉरेन्सिक विश्लेषणाचा हवाला देत पीडितेवर लैंगिक अत्याचार झाले नसल्याचं म्हटलं आहे. 22 सप्टेंबरच्या मेडिको लीगल प्रकरणात ((MLC) च्या अहवालात, बलात्काराचे कोणतेही पुरावे सापडले नसल्याच्या यूपी पोलिसांच्या दाव्यांचा विरोध केला आहे.

यावेळी उत्तर प्रदेशचे एडीजी (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी पीडित तरुणीच्या नमुन्यांमध्ये शुक्राणू किंवा वीर्य आढळलं नसल्याचं माध्यमांसमोर म्हटलं होतं. JNMC च्या फॉरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार, हल्ला झाला त्यावेळी पीडित तरुणी शुद्धीत नव्हती असा उल्लेख करण्यात आला आहे.

गळा दाबला, तोंड बंद केलं आणि धमकावलं
एकीकडे समोर आलेल्या माहितीनुसार, पीडितेचा स्कार्फने गळा दाबण्यात आला होता. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, चार संशयितांची नावं समोर आली होती. एमएलसीच्या अहवालानुसार पीडितेचं तोंड दाबण्यात आलं होतं आणि तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यावेळी तिच्यावर हल्लाही करण्यात आला होता. रिपोर्टमुसार, पीडितेच्या गळ्यावर जखमा होत्या, पण तिच्या योनीमार्गात कुठलीही जखम न झाल्याचं सांगण्यात आलं आहे. (hathras gangrape case 2 different medical reports of victim)

कम्पलीट पेनिट्रेशन
दुसरीकडे, एमएलसीने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला ‘कम्पलीट पेनिट्रेशन’ चा सामना करावा लागला होता. यामध्ये पीडितेच्या शरीरावर आणि कपड्यांमध्ये वीर्यचे नमुने असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. पीडित मुलीवर 14 सप्टेंबर रोजी हल्ला करण्यात आला होता. 22 सप्टेंबरला दुपारी 1.30 वाजता तपासणी अहवाल पूर्ण झाला. तपासणी करणार्‍या डॉक्टरांच्या माहितीनुसार पीडितेवर जबरदस्ती केली गेली होती.

अंतिम रिपोर्टमध्ये माहिती बदलली
10 ऑक्टोबरला हाथरस जिल्ह्यातील सदाबाद पोलीस स्टेशनमध्ये लिहिलेल्या पत्रात पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार झाले नाही असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यामध्ये ‘योनिमार्गासंबंधी किंवा लैंगिक अत्याचारासंबंधी कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

संबंधित बातम्या – 

यूपीत जातीय दंगल घडवण्याचं षडयंत्र, हाथरसच्या घटनेवर योगींचं वक्तव्य

योगी आदित्यनाथांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, हाथरस पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी संघर्ष- बाळासाहेब थोरात

(hathras gangrape case 2 different medical reports of victim)