जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची भीती, हायअलर्ट जारी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यानंतर, संपूर्ण राज्यभर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. श्रीनगरच्या राष्ट्रीय महामार्गावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सकाळी 7 ते 8 वाजण्याच्या दरम्यान हल्ल्याची शक्यता असून, या हल्ल्यासाठी बाईकचा वापर केला जाऊ शकतो, अशीही माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षा वाढवण्यात […]

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची भीती, हायअलर्ट जारी
Follow us on

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यानंतर, संपूर्ण राज्यभर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. श्रीनगरच्या राष्ट्रीय महामार्गावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सकाळी 7 ते 8 वाजण्याच्या दरम्यान हल्ल्याची शक्यता असून, या हल्ल्यासाठी बाईकचा वापर केला जाऊ शकतो, अशीही माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे.

जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षा वाढवण्यात आली असून, जवानांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दहशतवादी हल्ल्याच्या अलर्टनंतर आज सकाळी 9 वाजल्यापासून महामार्गावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच सुरक्षादलातील जवानांच्या सुरक्षेसाठी सरकारने मोठं पाऊल उचललं होते. जवानांच्या सुरक्षेसाठी जम्मू-काश्मीर-बारामुल्ला राष्ट्रीय महामार्गावर आठवड्यातून दोन दिवस सामान्य लोकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

गुप्तचर विभागाला मिळालेल्या माहितीनंतर जम्मू-काश्मीरमधील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. तसेच महामार्गावर प्रत्येक ठिकाणी जवानांसह पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

यावर्षी 14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीर हायवेवर पुलवामा हल्ला झाला होता. हा हल्ला जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेने केला होता. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. तेव्हापासून राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.