‘केसरी’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, आतापर्यंतची कमाई तब्बल…

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचा सिनेमा केसरीने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. केसरी सिनेमाने आतापर्यंत तब्बल 150 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अनुराग सिंह यांनी केलं आहे. तर सिनेमातील मुख्य भूमिकेत अक्षय कुमार याने काम केलं आहे. केसरी सिनेमाने पहिल्या आठवड्यातचं 100 कोटींची कमाई केली होती. विशेष म्हणजे हा सिनेमा परदेशातील […]

‘केसरी’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, आतापर्यंतची कमाई तब्बल...
Follow us on

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचा सिनेमा केसरीने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. केसरी सिनेमाने आतापर्यंत तब्बल 150 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अनुराग सिंह यांनी केलं आहे. तर सिनेमातील मुख्य भूमिकेत अक्षय कुमार याने काम केलं आहे. केसरी सिनेमाने पहिल्या आठवड्यातचं 100 कोटींची कमाई केली होती. विशेष म्हणजे हा सिनेमा परदेशातील सिनेमागृहातही धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत सिनेमाची वर्ल्डवाइड कमाई 150 कोटी झाली आहे. ही माहिती दिग्दर्शक करण जोहारने आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे.

करण जोहरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर सिनेमाचा बॅनर शेअर केला आहे. त्या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की, जगातील बॉक्स ऑफिसवर केसरीने भरघोस कमाई केली आहे. सिनेमातील अक्षय कुमारच्या अभिनयाने प्रेक्षकांकडून कौतुक केलं जात आहे. देशातील एकूण 3600 स्क्रीनवर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे, तर परदेशातील एकूण 600 स्क्रीन मिळाल्या आहेत.


केसरी सिनेमा बॅटल ऑफ सारागढीच्या कथेवर आधारित आहे. सिनेमामध्ये दाखवलं आहे की, 21 सिख, 10 हजार अफगानी सेनेसोबत लढत आहेत. याला आतापर्यंतची सर्वात कठीण लढाई समजली जाते. सिनेमात अक्षय कुमारने हवलदार ईश्वर सिंह यांची भूमिका साकारली आहे.

सिनेमात अभिनेत्री परिणीती चौप्राने काम केलं आहे. तिने अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे केसरी सिनेमा प्रदर्शित झाला त्यावेळी नोटबुक आणि जंगली सिनेमाही प्रदर्शित झाला होता. मात्र या दोन्ही चित्रपटांमुळे केसरीच्या कमाईत काही फरक नाही पडला. नोटबुक सिनेमा सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनली आहे. यामध्ये जहीर इकबाल आणि प्रनूतन बहलने मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच जंगली सिनेमाचं दिग्दर्शन हॉलिवूड दिग्दर्शक चक रसल यांनी केले आहे. यामध्ये विद्युत जामवालने मुख्य भूमिका साकारली आहे.