प्रत्येकाने लघवी साठवल्यास देशाचे 40 हजार कोटी वाचतील: गडकरी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

नागपूर: ‘युरीनपासून युरिया, अर्थात मूत्रापासून खत या माझ्या कल्पनेवर लोकं हसले, पण त्यांना हसू द्या. देशातील प्रत्येकाने आपलं युरीन अर्थात लघवी साठवून त्यापासून युरिया तयार केल्यास, देशाचे 40 हजार कोटी वाचतील, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. नागपुरातील सरपंच सम्राट पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. सरकारी कर्मचाऱ्यांवर निशाणा देशात साखर अतिरिक्त आहे, […]

प्रत्येकाने लघवी साठवल्यास देशाचे 40 हजार कोटी वाचतील: गडकरी
Follow us on

नागपूर: ‘युरीनपासून युरिया, अर्थात मूत्रापासून खत या माझ्या कल्पनेवर लोकं हसले, पण त्यांना हसू द्या. देशातील प्रत्येकाने आपलं युरीन अर्थात लघवी साठवून त्यापासून युरिया तयार केल्यास, देशाचे 40 हजार कोटी वाचतील, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. नागपुरातील सरपंच सम्राट पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

सरकारी कर्मचाऱ्यांवर निशाणा

देशात साखर अतिरिक्त आहे, डाळ अतिरिक्त आहे, तांदूळ अतिरिक्त आहे. म्हणून शेतीमालाला भाव मिळत नाही, सरकार कुणाचंही येवो, परिस्थिती तीच आहे, असं गडकरी म्हणाले.

सरकारी वाहनांमधील डिझेल चोरीला जात असल्याचं वास्तव सांगत पुन्हा गडकरींनी सरकारी कर्मचाऱ्यांवर निशाणा साधला.

मंत्र्यांना टोमणे

‘नेते बदल्या करण्यात भिडून आहेत, बदल्या करणे नेत्यांचं आवडतं काम आहे, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्यांना टोमणे लगावले. ग्रामीण भागातील आरोग्याची व्यथा सांगतानाच गडकरी म्हणाले, ‘गावात डॉक्टर नाही, डॉक्टर असला तर नर्स नाही, दोन्ही असले तर औषध नाही.  मग कोण मरायला जाईल त्या दवाखान्यात’.

गडकरी सांगतात गावांचं वास्तव –

‘पूर्वी गावात 85 टक्के लोक रहायचे, पण आता गावात 65  टक्के लोक राहतात. सुविधा नसल्याने 20 टक्के लोक गावं सोडून आले, त्यामुळे शहरातील समस्या वाढल्या, गावात काम नाही, चांगलं शिक्षण, क्वालिटी लाईफ नाही, म्हणून लोक गावं सोडतायत’ हे वास्तवंही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सर्वांसमोर मांडलं. देशात पाण्याची कमी नाही, पाण्याच्या नियोजनाची कमी आहे, असंही ते म्हणाले.