यूट्यूब आणि फेसबुक जर अलर्ट असते, तर न्यूझीलंड हल्ला टळला असता, कसा?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

नवी दिल्ली : न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च इथं दोन मशिदींवर माथेफिरुने हल्ला केला. या हल्ल्यात एकूण 49 जणांचा मृत्यू तर 41 जण गंभीर जखमी झाले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या 28 वर्षीय माथेफिरु तरुणाने हा हल्ला केला आहे. ब्रेन्टन टॅरेन्ट असं या तरुणाचं नाव आहे. विशेष म्हणजे हा हल्ला फेसबुकवर लाईव्ह दाखवण्यात आला. यामुळे संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली होती. […]

यूट्यूब आणि फेसबुक जर अलर्ट असते, तर न्यूझीलंड हल्ला टळला असता, कसा?
Follow us on

नवी दिल्ली : न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च इथं दोन मशिदींवर माथेफिरुने हल्ला केला. या हल्ल्यात एकूण 49 जणांचा मृत्यू तर 41 जण गंभीर जखमी झाले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या 28 वर्षीय माथेफिरु तरुणाने हा हल्ला केला आहे. ब्रेन्टन टॅरेन्ट असं या तरुणाचं नाव आहे. विशेष म्हणजे हा हल्ला फेसबुकवर लाईव्ह दाखवण्यात आला. यामुळे संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली होती. हल्लेखोराने एका कॅमेराच्या सहाय्याने हा हल्ला शूट करत फेसबुक लाईव्ह केले आणि काही सेकंदात हा फेसबुक लाईव्ह व्हिडीओ संपूर्ण जगभर व्हायरल झाला.

या भ्याड हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. यासोबतच फेसबुक आणि यूट्यूबरही मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. हल्लोखोराने केलेला हल्ला सोशल मीडियावर लाईव्ह दाखवला. मात्र यूट्यूब आणि फेसबुकच्या इंजिनिअर्सना हा व्हिडीओ थांबवता आला नाही का?, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. ही पहिलीच घटना नसून याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. आतापर्यंत आत्महत्यांचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हल्लेखोर ब्रेन्टने टॅरेन्टने 17 मिनिटाच्या फेसबुक लाईव्हमध्ये एकूण दोन राऊंड फायर केले. हल्लेखोराने मशिदीत घुसत अंदाधुंद गोळीबार केला. ऑस्ट्रेलियाच्या या तरुणाने द्वेषातून हा हल्ला केल्याचे समोर आलं आहे. या हल्ल्याआधी ब्रेन्टनने स्वत:च हल्ल्याची कृती लिहिली होती. स्थलांतरित मुस्लिमांना हकलण्यासाठी आणि युरोपच्या वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी त्याने हा हल्ला केल्याचं मॅनफिस्टोत नमूद केले आहे.

दोन दिवसात 60 लिंक पोस्ट

माथेफिरुने या हत्याकांडाची पूर्णपणे तयारी केली होती. गेल्या दोन दिवसापसून सोशल मीडियावर त्याने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन एकूण 60 लिंक्स पोस्ट केल्या होत्या. यावरुन असे संकेत दिले जात होते की, काही तरी होणार आहे. याशिवाय यूट्यूबवरही त्याने अनेक लिंक पोस्ट केल्या होत्या. हल्लेखोराने गोप्रो कॅमेऱ्याच्या मदतीने गोळीबार सुरु असल्याचा लाईव्ह व्हिडीओ फेसबुकला शेअर केला.

यूट्यूबची प्रतिक्रिया

यूट्युबने शुक्रवारी सकाळी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, न्यूझीलंडमध्ये घडलेल्या घटनेचा आम्ही खेद व्यक्त करतो. आम्ही हिंसक फुटेज हटवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो. तर ट्वीटरने सांगितले, आम्ही एक संदिग्ध अकाऊंट डिलीट केलं आहे आणि सर्व व्हिडीओही डिलीट केले आहेत.