देशात गुंडाराज, बलात्काऱ्यांना फासावर लटकवा, इम्तियाज जलील यांची मागणी

| Updated on: Oct 03, 2020 | 8:03 AM

उत्तरप्रदेशातील हाथरस गावातील पीडितेला औरंगाबाद शहरात एमआयएमच्या वतीने श्रद्धांजली देण्यात आली (Imityaj Jaleel on Yogi government).

देशात गुंडाराज, बलात्काऱ्यांना फासावर लटकवा, इम्तियाज जलील यांची मागणी
Follow us on

औरंगाबाद : उत्तरप्रदेशातील हाथरस गावातील पीडितेला औरंगाबाद शहरात एमआयएमच्या वतीने श्रद्धांजली देण्यात आली (Imityaj Jaleel on Yogi government). औरंगाबाद चौकात एमआयएमच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत कँडल पेटवून श्रद्धांजली दिली. यावेळी एमआयएम खासदार इम्तियाज जलीलही उपस्थित होते. इम्तियाज जलील यांनी भाजप आणि योगी सरकारवर सडकून टीका केली (Imityaj Jaleel on Yogi government).

“सुप्रीम कोर्ट, सीबीआय, लोकसभा आणि पार्लमेंटवर विश्वास आहे. परंतु याच संस्था धोका देत असतील तर काळजी करण्याची वेळ आली आहे. पीडितेच्या घरच्यांना भेटू नाही दिले म्हणजे हे गुंडाराज आहे”, असं इम्तियाज जलील म्हणाले.

“हाथरस घटनेतील बलात्काऱ्यांना औरंगाबादमधील क्रांती चौकात फासावर लटकावले पाहिजे. देशात जे सुरू आहे ही येणाऱ्या काळाची झलक आहे. भारतीय जनता पक्षाचे लोक रस्त्यावर का उतरत नाहीत. त्यांच्या घरी मुली, आई, बहिणी नाहीत का?”, असा सवालही यावेळी जलील यांनी उपस्थित केला.

“देशात गुंडाराज पसरला जात आहे. राहुल गांधींच्या कॉलरपर्यंत हात जात आहे म्हणजे पोलिसांचा नंगा नाच आहे. सर्व सिस्टम हे रिमोट कंट्रोलवर सुरू आहे. योगी आदित्यनाथला बाहेर काढले पाहिजे”, असंही जलील यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करून जबाबदारी झटकू नका, योगीजी, राजीनामा द्या: प्रियांका गांधी

योगीजी, मी तुमच्यापेक्षा वरिष्ठ, माझं ऐका, पीडितांना भेटू द्या : उमा भारती