‘त्या’ आरटीआय कार्यकर्त्याचे हातपाय तोडा : इम्तियाज जलील

| Updated on: Jan 26, 2020 | 10:25 PM

आपल्यावर तिरंगा रॅलीत हल्ला झाल्याचा आरोप करणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याचे हात पाय तोडा, अशी मागणी एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel supporter beaten rti activist) यांनी केली आहे.

त्या आरटीआय कार्यकर्त्याचे हातपाय तोडा : इम्तियाज जलील
Follow us on

औरंगाबाद : आपल्यावर तिरंगा रॅलीत हल्ला झाल्याचा आरोप करणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याचे हात पाय तोडा, अशी मागणी एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel supporter beaten rti activist) यांनी केली आहे. तसेच त्यांनी पोलिसांना संबंधित आरटीआय कार्यकर्त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणून झोडपण्याची मागणीही केली आहे. या मुद्द्यावरुन औरंगाबादमध्ये वातावरण चांगलेच तापल्याचे (Imtiyaz Jaleel supporter beaten rti activist) दिसत आहे.

“तो कार्यकर्ता एक ब्लॅकमेलर आहे. त्याने तिरंगा झेंडा खाली पाडला म्हणून माझ्या कार्यकर्त्यांनी त्याला मारले. माझ्या कार्यकर्त्यांनी जी मारहाण केली त्याचं मी समर्थन करतो. पोलिसांना सांगतो त्यांनी त्या कार्यकर्त्याचे हातपाय तोडा, मी पोलिसांना विनंती करतो की त्याला पून्हा पकडा पोलीस स्टेशनमध्ये घ्या आणि आणखी झोडपा”, असं इम्तियाज जलील यांनी सांगितले.

नदीम राणा यांनी काहीदिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या रागातून हा हल्ला झाला असल्याचे राणा यांनी म्हटले. यावेळी जलील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवरही हल्ला केला. त्यामुळे गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.