नवी मुंबईत कोकणचा हापूस आंबा दाखल

| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

नवी मुंबई : नवी मुंबईतील मार्केटमध्ये फळांच्या राजा अर्थात आंबा दाखल झाला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला मिळणारा हापूस आंबा यंदा मात्र जानेवारी महिन्यातच दाखल झाला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी हापूस आंबा जानेवारीत खूप कमी प्रमाणात एपीएमसीमध्ये दाखल होतो. मात्र यावेळी हापूस आंब्याच्या तब्बल 850 पेट्या दाखल झाल्या आहेत. गेल्या 30 वर्षात पहिल्यांदाचा इतका आंबा जानेवारी […]

नवी मुंबईत कोकणचा हापूस आंबा दाखल
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबईतील मार्केटमध्ये फळांच्या राजा अर्थात आंबा दाखल झाला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला मिळणारा हापूस आंबा यंदा मात्र जानेवारी महिन्यातच दाखल झाला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी हापूस आंबा जानेवारीत खूप कमी प्रमाणात एपीएमसीमध्ये दाखल होतो. मात्र यावेळी हापूस आंब्याच्या तब्बल 850 पेट्या दाखल झाल्या आहेत. गेल्या 30 वर्षात पहिल्यांदाचा इतका आंबा जानेवारी महिन्यात दाखल झाला आहे.

कोकणातील हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. यंदा कोकणात हापूस आंब्याचं उत्पादन वाढल्याचं दिसून येत आहे. यावेळी पडलेल्या थंडीचाही फायदा आंबा उत्पादकांना झाला आहे. गेल्या 30 वर्षात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात आंबा मार्केटमध्ये दाखल झाल्यामुळे, मार्केटमध्ये व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. हापूस आंब्याला मुंबई, नवी मुंबईसह राज्य आणि परराज्यातही मोठ्या प्रमाणात मागणी असते.

कोकणातून आज हापूस आंब्याच्या 600 पेट्या, तर दक्षिण भारतातून 250 हापूस आंब्याच्या पेट्या दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात आंबा दाखल झाला नव्हता, असं तेथील व्यपाऱ्यांनी सांगितले. एका पेटीसाठी दोन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत भाव आहे. एक पेटी 4 ते 6 डझनची आहे.

नुकतेच हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळालेले आहे. यामुळे हापूस आंब्यामध्ये ग्राहकांची फसवणूकही होणार नाही. बऱ्याचदा ग्राहकांना इतर राज्यातला आंबा हा हापूस आंबा असल्याचे सांगत फसवणूक केली जात होती. मात्र असा प्रकार आता घडणार नाही. जीआय मानांकनाशिवाय जर कोणी अन्य आंबा हापूसच्या नावे विकून फसवणूक करत असेल, तर त्याच्यावर कारवाई किंवा अटक होऊ शकते.