पुण्यासह राज्यातील काही भागातील तापमानात वाढ

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

पुणे : थंडीमुळे गारठलेल्या मुंबई आणि पुणेकरांना आता उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. गेले काही दिवस कडाक्याच्या थंडीने महाराष्ट्रासह मुंबई आणि पुण्यातही तापमानात घट झाली होती. मात्र आता उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. पुणे शहरातील तापमानात वाढ झाल्याने सुर्येदयापासून उकाडा जाणवतो. पुण्यात 36 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद […]

पुण्यासह राज्यातील काही भागातील तापमानात वाढ
Follow us on

पुणे : थंडीमुळे गारठलेल्या मुंबई आणि पुणेकरांना आता उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. गेले काही दिवस कडाक्याच्या थंडीने महाराष्ट्रासह मुंबई आणि पुण्यातही तापमानात घट झाली होती. मात्र आता उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. पुणे शहरातील तापमानात वाढ झाल्याने सुर्येदयापासून उकाडा जाणवतो. पुण्यात 36 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

अचानक सुरु झालेल्या गरमीमुळे सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात गरमी जाणवत आहे. पुढील दोन दिवस हेच तापमान स्थिर राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. वातावरणातील बदलामुळे हे फरक जाणवत आहेत. छत्तीसगड ते कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. यामुळे विदर्भात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवली आहे. तर मालेगावमध्ये उन्हाळा येण्याआधी 39.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे.

वातावरणात होणाऱ्या बदलामुळे गरमी आणि थंडीत बदल होत आहे. उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच मालेगावमध्ये 39.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद मालेगावमध्ये नोंदविण्यात आली आहे. बीड, अमरावती, सोलापूरमध्येही 38 अंशच्या पुढे, तर सांगली आणि विदर्भातील चंद्रपूर, ब्रम्हपुरी येथे 37 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद झाली आहे. सातारा, कोल्हापूर, नगरमध्ये 36 अंश सेल्सिअस तापमान वाढले आहे. तसेच राज्यातील निचांकी तापमान 15.2 नाशिकमध्ये नोंदविण्यात आले आहे. याशिवाय कोकण आणि गोवा व्यतिरीक्त राज्यातील अनेक ठिकाणी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आहे.

पुणे येथील गेल्या तीन दिवसातील तापमान

21… 36.4…17.5

22…36.2…19.2

23…36.2…16.6