नाशिक रोड रेल्वे स्थानकावर देशातील पहिले ऑक्सिजन पार्लर

| Updated on: Dec 20, 2019 | 9:35 AM

देशातील प्रमुख शहरात औद्योगीकरणामुळे दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचीही कमतरता भासू लागली. स्वच्छ आणि शुद्ध ऑक्सीजन मिळणं काही शहरांमध्ये तर अटळच झाले आहे.

नाशिक रोड रेल्वे स्थानकावर देशातील पहिले ऑक्सिजन पार्लर
Follow us on

नाशिक : देशातील प्रमुख शहरात औद्योगीकरणामुळे दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचीही कमतरता भासू लागली. स्वच्छ आणि शुद्ध ऑक्सीजन मिळणं काही शहरांमध्ये तर अटळच झाले आहे. पण हेच ऑक्सिजन 24 तास मिळण्यासाठी नाशिक रेल्वे स्टेशनवर ऑक्सिजन पार्लर (Oxygen parlour nashik road station) तयार करण्यात आले आहे.

देशातील पहिले ऑक्सिजन पार्लर हे नाशिक रेल्वे स्टेशनवर (Oxygen parlour nashik road station) तयार करण्यात आले आहे. सध्या या अनोख्या प्रयोगामुळे बरेच लोक या पार्लरला भेट देत आहेत. स्नेक प्लांट, आरेलिया बुश, ड्रॅगन बांबू, चायनीज बांबू, मनीप्लँट, झामीया, झेड प्लांट, बोनझा अशी झाडं येथे लावण्यात आली आहेत. या सर्व झाडांची नावे तुम्हाला नवीन वाटतील. मात्र ही सर्व झाडं प्रदूषण दूर करून ऑक्सिजन निर्माण करण्याचं काम करतात.

नासाच्या अभ्यासातही ही झाडं आरोग्यास उपायकारक असल्याचं समोर आले आहे. आता ही सर्व झाडांची रोपं नाशिकरोड स्टेशनवरील ऑक्सिजन पार्लरमध्ये बघायला मिळत आहेत. एकूण 18 प्राजाती ईथे उपलब्ध असून हे एक झाड 10 बाय 10 परिसरातील हवा शुद्ध करण्याचं काम करते. तसेच 24 तास ऑक्सिजनचा पुरवठा करते. विशेष म्हणजे या झाडांना 8 दिवसातून एकदाच पाणी टाकावे लागते.

रेल्वेस्टेशन म्हंटलं तर प्रदूषण हे आलेच पण आता या ऑक्सिजन पार्लरमुळे नाशिकरोड रेल्वेस्टेशनचा परिसर प्रदूषण मुक्त होण्यास मदत होणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या निम फ्रिज पॉलिसी अंतर्गत हा उपक्रम राबवला जात असून रेल्वे भाडे तसेच तिकीट विक्री व्यतिरिक्त रेल्वेला या माध्यमातून नफाही मिळणार आहे. अशाप्रकारचे पार्लर असणारे नाशिकरोड रेल्वेस्टेशन हे पहिलेच असे स्टेशन आहे.

या ऑक्सिजन पार्लरमुळे येथे येणाऱ्या प्रवाशांना ही वेगळीच अनुभूती येते. ऑक्सिजन पार्लर बघताच प्रवाशी आवर्जून त्या ठिकाणी बघण्यास जातात. त्यामुळे नाशिक रोड रेल्वे स्टेशन प्रशासनाने राबवलेला हा प्रयोग खरोखर उल्लेखणीय आहे. प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या इतर शहरांमधील रेल्वे स्टेशन परिसरात ही असा प्रयोग राबवावा म्हणजे जास्तीत जास्त ऑक्सिजनची निर्मिती होईल, असं लोकांकडून म्हटलं जात आहे.