विंग कमांडर अभिनंदन यांना ‘वीरचक्र’ने गौरवण्यासाठी वायूदलाची सरकारकडे शिफारस

| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

नवी दिल्ली : बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या वायूदलाने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय वायूदलाचे विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग 21 या विमानाच्या सहाय्याने शौर्य दाखवत ही घुसखोरी हाणून पाडली होती. अभिनंदन यांच्या या शौर्याचा वीरचक्र पुरस्काराने गौरव करण्यासाठी वायूदलाने केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. पुलवामा हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोट येथे एअर स्ट्राईक […]

विंग कमांडर अभिनंदन यांना वीरचक्रने गौरवण्यासाठी वायूदलाची सरकारकडे शिफारस
Follow us on

नवी दिल्ली : बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या वायूदलाने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय वायूदलाचे विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग 21 या विमानाच्या सहाय्याने शौर्य दाखवत ही घुसखोरी हाणून पाडली होती. अभिनंदन यांच्या या शौर्याचा वीरचक्र पुरस्काराने गौरव करण्यासाठी वायूदलाने केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे.

पुलवामा हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला होता. यानंतर पाकिस्ताननेही भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाकिस्तानच्या घुसखोरीला आक्रमक असे उत्तर अभिंनंदन यांनी दिले होते. तेव्हापासून अभिनंदन हे चर्चेत आले. अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले होते.

भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी एफ-16 विमान पाडले होते. यावेळी पाकिस्तानच्या हद्दीत अभिनंदन पडले आणि त्यांना अटक झाली होती. मात्र भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्ताननेही साठ तासानंतर अभिनंदन यांना सोडले. यावेळी अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या सैन्याला रोखठोक उत्तरही दिली होती.

अभिनंदन यांची बदली

पाकिस्तानमधून सुटका झाल्यानंतर अभिनंदन यांच्यावर उपचार करण्यात आले. फिट होऊन ते पुन्हा सेवेत दाखल झाले आहेत. पण सुरक्षेच्या दृष्टीने काश्मीर घाटीतून त्यांची बदली पश्चिम एअरबेसवर करण्यात आली आहे.