बीडच्या 61 वर्षीय पठ्ठ्याचा पाण्यातील योगा जरुर पाहा

| Updated on: Jun 21, 2019 | 11:35 AM

जागतिक योग दिनानिमित्त बीडच्या परळीत एका अवलियाने चक्क पाण्यावर तरंगत योगा केला. 61 वर्षीय अनिल मस्के यांनी पाण्यात योगाची विवध प्रात्यक्षिकं दाखवली.

बीडच्या 61 वर्षीय पठ्ठ्याचा पाण्यातील योगा जरुर पाहा
Follow us on

बीड : जागतिक योग दिनानिमित्त बीडच्या परळीत एका अवलियाने चक्क पाण्यावर तरंगत योगा केला. 61 वर्षीय अनिल मस्के यांनी पाण्यात योगाची विवध प्रात्यक्षिकं दाखवली. अनिल मस्के गेल्या तीन  वर्षांपासून पाण्यावरील योगा करतात.  परळीजवळ असलेल्या चांदापुर  धरणात ते नियमित योगा करतात. एकदा धरणात उतरले की ते दोन तास बाहेर निघतच नाहीत.

पाण्यावर तरंगत ते दहा पेक्षा जास्त आसने करतात. योगामुळे आरोग्य उत्तम राहतं. त्यामुळे अनिल मस्के मित्रांना योगाचा आणि पोहण्याचा सल्ला देतात. नागरिकांनी जास्तीत जास्त पोहण्याचा प्रयत्न करुन शरीरयष्टी राखावी असेही आवाहन मस्के यांनी केले आहे.

ऊन, वारा,पाऊस कोणत्याही परिस्थितीत अनिल मस्के हे तीन वर्षांपासून पहाटे पाच वाजता या धरणावर येतात. त्यांच्यासोबत त्यांच्याच वयातील मित्रदेखील नियमित पोहण्यासाठी येतात. मस्के यांच्या बऱ्याच मित्रांना पोहता येत नव्हते. पण मस्केंची प्रेरणा घेऊन आता सर्वच मित्रांनी पोहण्याचे योग्य प्रशिक्षण घेतले आहे.   रोगांपासून दूर राहण्यासाठी योगा करा शिवाय पोहण्यानेही आरोग्य चांगले राहते असं मस्के यांचं म्हणणं आहे.