बालपणीचे मित्र, एकत्र शिक्षण, स्पर्धा परीक्षाहीसोबत, IPS होऊन लगीनगाठ बांधली!

| Updated on: Jan 21, 2020 | 2:44 PM

नोएडाच्या पोलीस आयुक्तालात आयपीएस वृंदा शुक्ला यांची उपायुक्तपदी तर त्यांचे पती आयपीएस अंकुर अग्रवाल यांची अतिरिक्त उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे (IPS officers oppointed at Noida).

बालपणीचे मित्र, एकत्र शिक्षण, स्पर्धा परीक्षाहीसोबत, IPS होऊन लगीनगाठ बांधली!
Follow us on

लखनऔ : उत्तर प्रदेशातील लखनऔ आणि नोएडामध्ये नवे पोलीस आयुक्तालय सुरु झाल्यानंतर एका आयपीएस दाम्पत्याची चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यामागे कारणही अगदी तसंच आहे. नोएडाच्या पोलीस आयुक्तालात आयपीएस वृंदा शुक्ला यांची उपायुक्तपदी तर त्यांचे पती आयपीएस अंकुर अग्रवाल यांची अतिरिक्त उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे (IPS officers oppointed at Noida). हे आयपीएस दाम्पत्य मूळचे हरियाणाचे आहेत.

अंकुर अग्रवाल आणि वृंदा शुक्ला बालपणीचे मित्र आहेत. दोघांनी लहानपणी ‘अंबाला कॉन्व्हेंट जिजस अॅण्ड मेरी स्कूल’ या शाळेत एकत्र शिक्षण घेतले. त्यानंतरचे शिक्षणही एकाच महाविद्यालयात पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अंकुर आणि वृंदा दोघी परदेशात नोकरीसाठी गेले. तिथे त्यांनी काही दिवस खासगी नोकरी केली. त्यानंतर ते पुन्हा भारतात आले. भारतात आल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला आणि आयपीएस अधिकारी बनल्यानंतर दोघांनी लग्न केलं.

वृंदा शुक्ला यांना दुसऱ्या प्रयत्नात स्पर्धा परीक्षेत यश आलं. 2014 साली त्या आयपीएस अधिकारी झाल्या आणि नागालँडला त्यांची नियुक्ती झाली. त्यांचे पती अंकुर अग्रवाल यांना 2016 साली यश आलं आणि त्यांची बिहारला नियुक्ती झाली.

दरम्यान, नोएडाला आयुक्तालय सुरु केल्यानंतर सध्या अतिरिक्त उपायुक्त म्हणून अंकुर अग्रवाल यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. झोन-1 मध्ये त्यांची जबाबदारी असणारी आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नी वृंदा या थेट त्यांच्या बॉस राहणार नाहीत, मात्र सिनिअर नक्की राहतील (IPS officers oppointed at Noida). उपायुक्त वृंदा सुट्टीवर असल्या तर उपायुक्तांची संपूर्ण जबाबदारी त्यांचे पती अतिरिक्त उपायुक्त अंकुर अग्रवाल यांच्यावर राहील.